Thursday, 24 July 2014

शिवराय हे नावच असे आहे जे घेतल्यावर अंगात एक रोमांच उठतो


शिवराय
हे नावच असे आहे जे
घेतल्यावर अंगात एक
रोमांच उठतो , अंगात
१०० हत्तींचे बळ येत
ये उगाच नाही हजारो वर्षाच्या अंधाराला मुक्त करून सुवर्ण किरणे दाखवणारा दुसरा कोणी नाही , तो होता जिजाऊचा छावा ,, मर्द जन्मला तो याच सह्याद्री कुशीत ,,महाराष्ट्राच्या मुशीत .. एकदा शब्द टाकला तर माघार कदापि घेणार नाही ... आई साहेबांनी शिकवण दिली ती तीच शिकवण या शिवबाराजांनी पाळली . शिवबा तुम्ही फक्त आमचेच पुत्र नाही तर अवघ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहात ... आपल्या मुळे कोणाला दुख: अथवा त्रास होता कामानये.. हीच शिकवण घेऊन शिवबा राजे स्वराज्या साठी ,, सतत मरण पाठीवर घेऊन लढत होते .. होते शेकडो मावळे जीवाचे जिवलग .. राजे आम्ही आहोत तुम्ही काळजी न करावी ,, स्वराज्य साठी प्राण गेला तर बेहत्तर पण माघार घेणार नाही तुम्ही निच्छिंत राहावे ,, आणि याच मावळ्यांच्या साथी वर विस्वास ठेऊन राजे स्वराज्य उभे करत होते .. निशाण भगवे , मोघलांच्या छाताडावर रोवल्या शिवाय माघार नाही घेतली कधी ..
म्हणून म्हणतात मर्द मराठा भडकला
तेव्हा भगवा झेंडा फडकला

महान तू राजा महान तुझे
मावळे
नाही होणार तू पुन्हा
नाही होणार पुन्हा
तुझे मावळे
शब्दात मांडता
येणार नाही तुझा पराक्रम
नाही लिहता येणार तुझा
पराक्रम
मुजरा तुला माझ्या राजा
तूच या महाराष्ट्राचा
भाग्य विधाता .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
अजयसिंह घाटगे सरकार

No comments:

Post a Comment