Thursday, 24 July 2014

पोवाडा क्रमांक ७ आपली प्रतिकिया जरूर कळवावी . काही चूक असेल तर नक्की सांगावी ..

पोवाडा क्रमांक ७ आपली प्रतिकिया जरूर कळवावी . काही चूक असेल तर नक्की सांगावी ..

महाराष्ट्राचा वाली
शिवबा राजा जन्मला
जन्मताच शिवनेरीवर
भगवा झेंडा फडकला
जी जी र जी
माझ्या शिवबा तू र
स्वराज्याचा वाली तू र
महान योध्दा तू र
जी जी र जी ||२||

कापले मोघल गाढले मातीत
अन्याय कुणावर नाही केला
जिजाऊ चा पुत्र शोभला
भगवा झेंडा फडकला
जी जी र जी
माझ्या शिवबा तू र
स्वराज्याचा वाली तू र
महान योध्दा तू र
जी जी र जी ||२||

बाल वयातच घेतले शत्र
मोघलांचा खात्मा
करायला
कापून सारे मोघल
छाताडावर त्यांच्या भगवा
फडकला
जी जी र जी
माझ्या शिवबा तू र
स्वराज्याचा वाली तू र
महान योध्दा तू र
जी जी र जी ||२||

महाराष्ट्राचा वाली
तूच महाराष्ट्र
घडविला
नाही संपणार सांगून
महती
असा तूच योध्दा शोभला
स्वराज्यात तुझाच जय जयकार
घुमतो मुजरा तुजला माझ्या
राजा
जी जी र जी
माझ्या शिवबातू र
स्वराज्याचा वालीतू र
महान योध्दा तू र
जी जी र जी .. ||२||

जय जिजाऊ
जय शिवराय जय शिवराय जय शिवराय

लेखक
अजयसिंह घाटगे सरकार .

No comments:

Post a Comment