Friday, 18 July 2014

सह्याद्रीचे वीर पुत्र

सह्याद्रीचे वीर पुत्र
ज्यांचे फक्त नाव घेता
अंगावर येतो काटा
अंगात उफाळतोय रक्ताचा लाव्हा
अरे का नाही उफाळनार लाव्हा
पराक्रमच असा आहे ज्याला कसलीच सीमा
नाही
कुण्या दुसऱ्याला ते जमणार नाही
आगीची होळी पहिली असेल तुम्ही
पण रक्ताचा अभिषेक केला आहे
सह्याद्रीच्या वाघन
हि सह्याद्री अजून हि गुण गान गाते
माझ्या शिव-शभूंचा
चढता रायगडाची पायरी सांगतो
इतिहास रायगड माझ्या राजाचा
का होऊ नये जय जय कार
माझ्या शंभू राजाचा
मरणाच्या दारात असताना हि
मरण पत्करले पण शरण नाही
गेला माझा शंभू छाव्वा
छावा असावा तर शंभू सारखा
दाखउन दिले आहे शंभूराजान
याच बाप लेकांच्या
पराक्रमातून उभ राहिलंय हे स्वराज
हे स्वराज..

जय जिजाऊ
शिव-शंभूना मानाचा मुजरा

लेखक_कवी
अजय घाटगे
१७.०७.२०१४

No comments:

Post a Comment