जय शिवराय
राजे तुमचे शौर्य
या भगव्यात हि दिसतेच , तुमचा पराक्रम दिसतोच या भगव्यात राजे या
सह्याद्रीच्या कुशीत महाराष्ट्राच्या मुशीत तुम्ही जन्माला आलात हेच भाग्य
आहे या मातीच.... पांग फेडिला तुम्ही या मातीचा .
तुम्ही स्वराज्या साठी
लढलात . तुम्ही हि माती गुलाम गीरीतून मुक्त करण्या साठी जीवाची हि पर्वा
नाही केली ,, स्वताचा छावा या महाराष्ट्रा साठी अर्पण केलात .
पण
राजे आज सर्व विसरलो अहो आम्ही , कोण बाजी कोण मुरारी कोण तानाजी आत्ताच्या
आमच्या पोरांना माहित नाही राजे .. तुमचा जय जयकार घुमतो .. तो फक्त
तुमच्या जयंती दिवशी ,,, बाकीचे दिवस आम्ही गुलाम गिरित काढतो , राजे
तुम्ही स्वराज्य निर्माण केले माझा महाराष्ट्र माझी रयत आनंदात राहावी
म्हणून . इथे तुमचेच मावळे , आज खादीची कपडे घालून राजकारणी झाले आहेत ,,
राजकारणा खातीर ,, ते माणुसकी हि विसरले आहेत .. राजे तुम्ही सांगितले होते
स्वराज्य साठी लढा महाराष्ट्रा साठी झगडा पण आज इथे स्वराज्या साठी नाही
तर खुर्ची साठी लढले जाते ,, स्वताच्या भावाचा हि इथे घात केला जातो ..
तुम्ही आज असता राजे तर असे नसते .. राजे आज हि लोक म्हणतात तुम्ही पुन्हा
जन्माला या पण राजे तुम्ही पुन्हा येउन काय करणार इथे , तुमचे स्वराज्य
इथे राखलंय कुठे .. तुमच्या राज्यात सर्व .. धर्म जाणले जात होते , आज इथे
धर्माच्या नावावर राजकारण केले जाते ..नाही माणुसकी जाणली जात इथे .. आज
इथे जाणला जातो तो मी पणा..... आज स्वराज्या साठी लढणारे मावळे नाहीत राजे
.. इथे खुर्ची साठी .. आणि स्वार्था साठी एक मेकांचे पाय खेचणारे जन्मले
आहेत ,,
खरच राजे तुम्ही
यावे पुन्हा या सह्याद्री कुशी
पाहावे हे तुमचे स्वराज्य
पहावे तुमचे आजचे मावळे
आजचे मावळे म्हणजे
स्वराज्या साठी नाही तर
स्वार्था साठी लढणारे
स्वार्थी लोक आहेत
राजे पुन्हा या स्वराज्यात
जन्माला आलात तर
एकटे येऊ नका राजे
तुमचे सवंगडी घेऊन
यावे सोबती
तेच लढू शकतात स्वराज्या
साठी
तेच झगडू शकतात महाराष्ट्रा साठी
तुमची शिकवण तेच पाळू
शकतात राजे...
मुजरा राजे मुजरा __//\\__
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक
अजयसिंह घाटगे सरकार
२३.०७.२०१४