Saturday, 3 August 2013

विचार केला


गेलीस सोडून एकटे म्हणून विचार केला
विसरायचे तुला आता बास झाले  आता
हे सर्व आठवा आठवी
खूप विसरायचा प्रयत्न केला पण नाही जमले
जिथे गेलो तिथे तुझेच आभास होते
म्हणून एक कविता लिहू म्हंटले तर
कविते मध्ये हि तुझेच नाव तुझेच
शब्द तुझ्यासाठीच तुझ्याच आठवणीत
होती ती कविता हि लिहायची सोडली
आणि लेखणी हि सोडली
तर,
ती  लेखणी हि माझ्यावर रागावली
शेवटी ती बोललीच मला .
अरे जिच्या साठी तू सर्व कविता लिहल्यास
तिच्यावर एक विरह कविता लिहू शकत नाही
तू ,
ती सोडून गेली तुला म्हणून सर्व विसरलास तू
तिच्या साठी लिहायचं बंद केलेस तू
अरे लिही रे हे जग तुझेच आहे कोण गेले म्हणून
तू थांबू नको तुझ्या साठी तर शब्द आहेत
तिच्या साठी कोण आहे एक तूच होतास
तुला मिळवाय ला ते हि जमले नाही तिला
तिच्या साठी तू का तुझे आयुष बरबाद
करतोय जिला तुझी कदर नाही
येईल पुंन्हा कोण तरी तुझ्या आयुष्यात
कायम तुझीच होईल ती
तू तिच्या साठी लिही जी येणार आहे
तुझ्या आयुष्यात गेली तिचा
विचार सोड आता वेड्या'
तिला आठवण्याच्या नादात
तू मला विसरून जाशील मग कोण आहे
तुझ्या एकांतात कोण साथ देणार तुला
आयुष भर तू नको काळजी करू कोणाची
शेवटी कोणी नाही दिली साथ तर शब्दच
साथ देतील तुझी...
शब्दांशी मैत्री कर शब्दच प्रेम तुझे शब्दच नाते ,,,,,,,,,,,,,

...........शब्दांशी नाते माझे शब्दांशीच मैत्री आणि शेवटी शब्दच प्रेम माझे ...........



अजयराजे.
०३.०८.२०१३
१२.३१ दुपार  

No comments:

Post a Comment