Saturday, 31 August 2013

तू असतीस तर


 
 
तू असतीस तर आज मी एकटा नसतो
तू असतीस तर आज माझ्या भावना दुखावल्या नसत्या
तू असतीस तर आज मी तुझ्या सोबतच असतो
तू असतीस तर माझा आनंद आकाशात मावला नसता
तू असतीस तर आज मी एकांत जवळ केला नसता
तू असतीस तर तुला जे हवे ते मी दिले असते
तू असतीस तर मी जितके हवे तितके प्रेम तुझ्यावर केले असते
तू असतीस तर तुझ्या सुखात नसलो तरी
तुझ्या दुख:त तर नक्की भागीदार असतो.
तू कसे समजून नाही घेत कि
तुझ्या साठीच तू नाहीस म्हणून मी आज,
माझा एकांत जवळ केला आहे
तुझ्या साठीच एकांत जवळ करून
आज सर्वात जास्त धोका पत्करला आहे
तुझ्या साठीच आज मी एकटा जगत आहे
तुझ्या साठीच फक्त तुझ्यावर प्रेम करत आहे...
परत ये सखे आज मी तुझीच वाट पाहत आहे

अजयराजे घाटगे.
०१.०९.२०१३

No comments:

Post a Comment