Thursday, 22 August 2013

हि माझी आयुष्यातील पहिली कविता...........

हि माझी आयुष्यातील पहिली कविता...........
**********************************
माझे स्वप्न आहे आयुष्यात एक तरी कविता लिहायचं
माझे स्वप्न आहे शब्दांशी मैत्री करायचं
मनाला शब्दां मध्ये गुंतवायच
शब्दातून शब्दांशी बोलायचं
मनातील मनाला शब्दातून उतरायचं
तुझ्या मनाला शब्दातून ओळखायच
भावना नाही कळल्या तुला तरी
त्या शब्दातूनच मांडायच्या
सुंदर सुंदर शब्दातून तुझे वर्णन
करायचं,
ओठातून नाही जमले तर
त्याच शब्दातून तुझे प्रेम व्यक्त करायचं,
माझे स्वप्न आहे
काही तर स्वत: लिहायचं स्वत: साठी
नाही जमले तर दुसऱ्या साठी तरी लिहायचं.
पण खरच लिहायचं काही तरी लिहायचं ......

अजयराजे घाटगे....

No comments:

Post a Comment