Monday, 11 November 2013

लेख _दिवस....................


दिवस....................

दिवस येत आहेत जात आहेत म्हणून आपण फक्त दिवस काढायचे नसतात त्याच दिवसा मधून
नाहि तर नवीन नवीन गोष्टी शिकायच्या असतात......त्याच दिवसामध्ये काही तर चांगली कामे करायची असतात.......... आपल्या साठी तर सर्वच जगत असतो पण दुसऱ्या साठी काही क्षण जगायचे असतात आणि तेच महत्वाचे असतात............
सर्वच दिवस सुंदर असतात.......पण ते सुंदर दिवस आपण सुंदर पहायचे असतात.......काही होणार नाहि म्हणून शांत कधीच बसायचे नसते..........त्या नाहि होण्यातुनच काही तर मिळवायचे असते.......
खूप दिवस आनंदाचे.....काहीच दिवस दुःखाचे असतात त्या दुख:ला खचून जाऊन उद्याचे स्वप्न धुळीस मिळवायचे नसते......तर त्या स्वप्ना साठी त्या दुख:ला धुळीस मिळवायचे असते....... शेवटी कोण काहीच घेऊन जात नाहि जे आहे ते इथेच सोडून जातो.........मागे नाव राहण्या साठी चार माणसे कमवावी लागतात....... आयुष खूप सुंदर आहे पण ती सुंदरता स्वताच शोधावी लागते .......


लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment