Friday, 15 November 2013

लेख लेखणी आणि मी


जेव्हा मला लिहायचं न्हवते तेव्हा माझी लेखणी मला बोलायची अरे वेड्या काय अस करतोय स्वताच्या स्वार्था साठी साठी तू मला काम लावतोय आणि आज तुला मी नको आहे तर तू मला लगेच बाजूला करतोय... ..........तेव्हा मी तिला बोलायचो अग तुला नाही बाजूला करत मी ..........मी थोड लिहायचं थांबतोय कश्या साठी लिहायचं आणि कोणा साठी लिहायचं लिहून तरी काय करायचं नाही कोणाला माझी कदर.................आणि कोणाला माझ्या शब्दांशी घेणे देणे मग काय करू मी लिहून तुझी झीज करून काय मिळणार आहे मला तू जाशील संपून मग तुझ्या शिवाय आहेच कोण माझ्या सोबतीला एक तूच आहेस जी माझ्या सोबत कायम असते कधी तू माझ्या कडे काही न मागितले.............तरी हि मी तुलाच झीझवले स्वताच्या लिखाणा साठी..... मी तुलाच मागितले..................मला नाही लिहू वाटत आता कोणाला नाही पटत मी लिहिलेलं या स्वर्थी जगात कोण कोणाचे नाही मग माझे तरी कोण असणार एकच तू आहेस जी माझ्या सोबत सुख दुख:त .........कायम माझ्या सोबती असते तुझ्या शिवाय मला हि नाही राहू वाटत पण तुला थोडी विश्रांती द्यायची म्हणतोय.........तेव्हा तीच लेखणी मला बोलायची..........अरे वेड्या मी तुझ्या साठीच जन्म घेतला आहे तू एक कवी आहे तुझे विचार हि छान आहेत तुला लिहायची हि सवय आहे मी फक्त तुला मदत करत आहे तू एक कवी आहेस म्हणून नाही तर माझा एक चांगला मित्र आहेस म्हणून मी तुला मदत करत आहे ......... तू लिही खूप लिही तुझ्या पाठीशी कोणी नसले तरी मी कायम सोबत आहे........दुसऱ्या कडून काही हि आणि काश्याची हि अपेक्षा करू नको तू लिहित राहा बाकी कसला हि विचार करू नको कोण काही बोलताय या कडे विचार करण्या पेक्षा तू स्वत: काय करत आहेस या कडे लक्ष दे ........ तू एक खूप मोठा लेखक_कवी होशील.........
म्हणून सांगतो.......... लिहणार्यानि लिहित जावे कोण काय बोलतील या कडे कधीच लक्ष न द्यावे......
जमलेच तर अपेक्षेला हि दूर ठेवावे............

लेखक_कवी
अजय घाटगे
१४.११.२०१३

No comments:

Post a Comment