Saturday, 9 November 2013

मैत्री

आज तू भेटलीस भेटून खूप बरे वाटले
तुझ्याशी बोलताना आपले कोणी वाटले
खरच तू मला भेटशील हे स्वप्नात हि वाटले
न्हवत,आपली मैत्री इतकी घट्ट नि स्वार्थी
होईल हा विचार हि कधी मनात आला न्हवता
मी काही तरी पुण्य केले असावे म्हणून
आपली भेट झाली असेच मला वाटते
कधी माझ्या कडून चूक झालीच तर लगेच सांगत
जा,कधी कधी चुका होतात माणसा कडून
नाराज कधी होऊ नको माझ्यावर
तुझी मैत्री माझ्या सोबत अशीच कायम ठेव
नाही सारखी आठवण काढलीस तर चालेल
पण विसरून मात्र जाऊ नको,
आज मी एक लेखक आहे म्हणून नाही लिहिले हे
आज फक्त मी तुझा मित्र आहे म्हणून लिहिले
आहे काही चुकले असेल तर माफ कर.
शेवटी एवढेच लिहीन,
तुझ्या आयुष्यात जे तुला हवे ते मिळो
तुझ्याशी असलेली सुखाची सांगड कधी दूर न जावो
तुझ्या आयुष्यात तू कायम हसत राहावी...
हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.........


लेखक_कवी
अजय घाटगे............

No comments:

Post a Comment