Friday, 21 November 2014

कसे रे असे तुझे मन काय

कसे रे असे तुझे
मन
काय
असते तुझ्या
मनात
कधी दुख तर
कधी
हसणे
तुझ्या नशिबात
कधी
जाणले काय
तुने शब्दाचे मन
काय बोलत असतील
ते तुला
कि तुला फक्त
तुझ्या
मनाची पर्वा
कधी दुखी
असते का तुझे मन
कि कविता
करण्या साठी
फक्त दुखी
तू तुझे मन
शब्दा मध्ये गुंतलेल
असते कि
तुझ्या शब्दा
खातर
तू त्याला
गुंतवतोस
कसे तुझे मन
असते रे कवी
मला हि
सांगशील
का जरा
तुझ्या
सारखे लिहायचं
आहे मला
पण
त्या आधी
तुझे मन
जाणून
घ्यायचे
आहे मला
सांगशील का रे ?
तुझे मन मला
सांगशील का रे
तुझ्या
मनातील
भाव मला
कि तुझे हि
मन माझ्या
सारखेच
आहे रे कवी मना
पण
एक सांग तू
कधी कधी
आठवतोस काय
कुणाला कि
शब्दा मध्ये
पाहतोस कुणाला ...
लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार

No comments:

Post a Comment