Friday, 13 September 2013

नवा बहाणा

भेटसी करून नित्य नवा बहाणा
गुलाबापरी चेहरा दिसतो देखणा

केसात गंधित मोगऱ्याचा गजरा
गालावर खुलतो लालिमा लाजरा

दिवस मजेत सरतो तुझ्या गोड सहवासात
जाता तू आपसूक भिजती डोळे पापण्यात..

अजय घाटगे..

No comments:

Post a Comment