Monday, 2 September 2013

आहे माझी एक मैतरिन

आहे माझी एक मैतरिन
आहे माझी एक मैतरिन तीची मैत्री मला खूप आवडते
ती मला वर्षातून साधारण दोन वेळा तरी भेटते
भेटली कि साऱ्या वर्षाची कहाणी सांगते
ती कहाणी सांगत असताना तिच्याकडेच
पाहत बसावे वाटते,
ती फोन तर मला रोजच करते
पण तिला माझ्या चेहऱ्यावरचे हस्ष आवडते
म्हणून ती
भेटल्यावरच सर्व काही सांगत असते
मी कमी हसतो हाच तिचा आरोप कायम असतो
माझ्यावर
पण तिला हे माहित नाही ती तिला पाहिल्यावर माझे
आनंद अश्रू निघतील म्हणून मी माझे हसणे
लपवत असतो,
माझ्या आयुष्यात हि एकाच मैतरिन अशी आहे
कि माझ्या सुखात नसेल पण दुखत नक्की भागीदार असते
अशी हि मैतरिन मला नशिबानेच मिळाली आहे असेच
मला कायम वाटत असते..
आज तिची खूप आठवण येत आहे म्हणून तिचा आठवणीना
उजाळा देण्या साठीच मी हे लिहिले आहे...........

थोडे दुख:त तर थोडे आनंदात लिहिले आहे
कसे लिहिले आहे हे हि मला माहित नाही मित्रानो ..........

अजयराजे घाटगे.
०१.०९.२०१३
०६.०० संध्याकाळ

No comments:

Post a Comment