Saturday, 7 September 2013

मी मजेत आहे


चिंता तू माझी करू नको मी मजेत आहे
तुझ्याच साठी आनंदात राहत आहे
तुला आवडत नाही म्हणून अश्रुनाही
आज फिरायला पाठवत आहे
तू आनंदात आहेस ह्यातच माझा आनंद
सामावला आहे
चिंता तू माझी करू नको मी मजेत आहे..

अजयराजे घाटगे
०७.०९.२०१३

No comments:

Post a Comment