Tuesday, 9 July 2013

""जगीन मी तुझ्याशिवाय""

आभार :- विजय देशपांडे ...............


""जगीन मी तुझ्याशिवाय""

जगीन मी तुझ्याशिवाय
विसरेन मी सारे दुःख
झाला आहे निरुपाय
तरीपण हृदयाचं दार
तुझ्या साठी ठेवीन मी उघडं
मला झालेल्या दु:खाला विसरून
सुखाला परत आणीन मी
जगीन मी तुझ्याशिवाय
तुझ्यावर मनापासून प्रेम करतो
तुझ्या सुखा साठीच मी
तुझ्या पासून दूर राहतो
माझ्या प्रेमाची कदर नाही तुला
तरीपण तुझ्या साठी हृदयाचं
दार ठेवीन मी उघडं
राहीन मी तुझ्या शिवाय मी आनंदी
जगीन मी तुझ्याशिवाय
तुला सर्व काही मिळेल पण माझ प्रेम
आणि मी आता कधीच नाहि मिळणार
प्रेम म्हणजे खेळ समजलास
त्याच प्रेमाचा अर्थ तुला
एक दिवस नक्की कळणार
आता पर्यंत आयुष तुझ्या जगत होतो
आत ते माझ्या साठी जगणार
मी जगीन मी तुझ्याशिवाय.
हे तू हि बघणार आहे

अजयराजे...
२९.०५.२०१३

No comments:

Post a Comment