Saturday, 27 July 2013

जा तू .......

जा तू .......
अजून काय हवे आहे तुला जे आहे ते तुझेच आहे
जे काही घेऊन जायचं ते जाऊ शकते मला आता
नाही गरज तुझी,
आयुष्यात एकदाच प्रेम केले होते ते पण फक्त तुझ्यावर
पण तुला नाही कळले नाही तुला तो एक पोर खेळ वाटला असेल
पण माझ्या साठी ते मी पहिल्यांदा केलेलं मनापासून जीवापाड प्रेम
होते आता म्हणते मी नाही केले प्रेम तुझ्यावर जर येवडेच
करायचं होते का आलीस माझ्या आयुष्यात कश्या साठी आलीस
मी एकटा खुश होतो ग आयुष्यात अगदी येखांदया पाखरा सारखा
बागडत होतो तू आलीस वाटले होते ह्या एकट्या जीवाला कोणी तरी आपले
वाटले म्हणून मी तुझ्यावर जीव पाड प्रेम करत होतो पण तुला ते नाही
समजले तुला विस्वासच नाह्वता ना माझ्या प्रेमावर म्हणून तू चाललीस
ठीक आहे मी नाही अडवणार कारण माझ्या कडे सर्वाना माफी असते आणि तुला हि तेच असणार आहे जा माफ केले तुला तुला सर्व अधिकार दिले होते ना मी मग त्यातीलच हा एक समज
पण आयुषात जो खेळ तू माझ्याशी खेळलीस.
तो परत नको कोणाशी खेळू मला तर सवय आहे एकटे राहण्याची पण तुझ्या ह्या खेळा मध्ये कोणाला जीव घेऊ नको.....
कारण जीवन हे एकदाच मिळते आणि प्रेम हे एकदाच होते परत परत होत तो एक टाइम पास असतो....
जा तू काळजी घे............



अजय राजे .
२२ .०७ .२०१३

No comments:

Post a Comment