Saturday, 6 July 2013

तू म्हणतेस.....


तू म्हणतेस.....
तू म्हणतेस कविता लिही माझ्यावर
पण शब्दच सुचत नाहीत .
डोळ्यांसमोर सारखे
तुझेच चित्र असते
काय लिहू तुझ्यावर
हेच मला समजत नाही
तूच दिसतेस सर्व ठिकाणी
सर्वत्र तुजेच भास असतात
तुझ्यासाठी काय लिहावे
तेच मला कळत नाही,
तुझ्या साठी कितीहि
लिहिले तर ते कमीच असते
तू आहेसच इतकी सुंदर
कि तुझावर लिहिताना
माझी लेखणी हि मला प्रश्न करते
काय लिहणार तू हिच्या सौंदर्यावर
तरी हि तू म्हणते लिही
एखांदी कविता माझ्यावर
मी लिहितो ते सर्व
तुझ्या साठीच असते
हे तुला किती वेळा समजावले
तरी हि तू म्हणते लिही
एखांदी कविता माझ्यावर .............

अजयराजे..
२६.०५.२०१३

No comments:

Post a Comment