Thursday, 6 March 2014

आज तू बोलायचं मी ऐकायचं

आज तू बोलायचं मी ऐकायचं

आज तू बोलणार आणि मी ऐकणार
जेव्हा भेटेल तेव्हा मीच बोलत असतो
माझ्या मनातील भावना तुझ्या समोर
बिन घोर मांडत असतो
कधी तुला मनापासून बोलू वाटत नाही
का कधी तुझ्या मनातील भावना
मला सांगू वाटत नाहीत का
कि तुला त्या संगायच्याच नाहीत
खूप वेळा भेटलीस
पण जास्त काही बोलली नाहीस
मला याच कारण हि माहित नाही
माहित असते तर विचारले देखील
नसते
मला हि वाटते तुझ्या मनातील भावना
जाणून घ्याव्यात मला हि मन आहे
तेच मन सांगते तुला काही त्रास
आहे का हे हि मला समजावे
म्हणून आज तू बोलायचं
आणि मी फक्त ऐकायचं .

लेखक_कवी
अजय घाटगे .
०५.०३.२०१४

No comments:

Post a Comment