Wednesday, 7 May 2014

पोवाडा क्रमांक -५ जय शिवराय

पोवाडा क्रमांक -५
जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
अरे
नमन त्या राजाला
सयाद्री च्या वाघाला
जिजाऊ च्या पुत्राला
जिजाऊ च्या पुत्राला
जीर जी जीर जी जी जी . !!२ !
शिवबा छत्रपती आहे महान
भिडला मोघलांशी जोमान
घाबरला मोघलांचा सरदार
अफजल खानाचा कोथळा काढून
केला महाराष्ट्र हा साकार
केला महाराष्ट्र साकार
जीर जी जीर जी जी जी . !!२ !
अन्याय करू नाही दिला कधी
नाही केला अन्याय कुणावर
गाढला मातीत तो अन्याय
दिला सर्व सामान्य जनतेला आधार
सामान्य जनतेला आधार
जीर जी जीर जी जी जी . !!२ !
कामी आली जिजाऊ ची शिकवण
सारे जग गाते गुणगान
राजा आहेच माझा महान
महान जीर जी जीर जी जी जी . !!२ !
जय शिवराय जय शिवराय जय शिवराय .
लेखक_कवी
अजय घाटगे
०७.०५.२०१४

No comments:

Post a Comment