Tuesday, 6 May 2014

आई मला शाळेत जायचय

आई मला शाळेत जायचय
मला खूप शिकायचं आई
तुझे आणि बाबांचे स्वप्न पूर्ण करायचं
पण आई तुझ्या शिवाय मला
बाहेर राहवतहि नाही
बाबा हि नसतात माझ्या सोबत
मग तुझ्या शिवाय माझ्या
सोबत कोणी हि नसते
जर मी शिकलो तर मला
हे माझे गाव सोडून
बाहेर नोकरी वर जावे लागेल ना
जसे बाबा जातात
म्हणून नको वाटत शाळेत
जायला
पण आई मला हि शाळेत जायचं आहे
मी आता मनात ठरवलं आहे
मी आता जाणार शाळेला
तुझे स्वप्न पूर्ण करणार मी
आई
फक्त तू आशीर्वाद हवा आहे आई .

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment