Tuesday, 17 May 2016

का र नाव लिहता गडकोटांच्या भिंतीवर जातंय फिरायला गड कोटावर कधी ढासळनारा दगड सावरला आहे का तुम्ही गडकोटावर ??

का र नाव लिहता गडकोटांच्या भिंतीवर
जातंय फिरायला गड कोटावर कधी
ढासळनारा दगड सावरला आहे का तुम्ही
गडकोटावर ??

खूप छान अक्षर असते तुमचे भिंतीवर
तेच अक्षर लिहा ना तुमच्या बापाने
बांधला आहे ना तुमच्या साठी महाल
त्या वर ??

मोकळा श्वास देखील नाही भेटत
गडकोटांच्या भिंती बुरुजांना
त्या साठी काय केले आहे का
तुम्ही जाऊन गडकोटांवर ??

कि मौज मजे साठीच जाता
तुम्ही गडकोटांवर ??

नावेच लिहायची आहेत तर
लिहा ना तुमच्या बापाच्या
घरावर जे आज हि नाही
तुमच्या नावावर ??

ते हि नाही जमले तर
तुमचे अक्षर उमटावाना
तुमच्या प्रेमिकेच्या
बापाच्या घरच्या भिंतीवर ??

लेखक/कवी
सरकार अजयसिंह घाटगे

No comments:

Post a Comment