Tuesday, 17 May 2016

तुझ्या या लेखनी वर।।

आज लेखनी बाेलली
का रे शांत का झालास
कधी न डाेके धरुन
बसनारा डाेके का धरुन
बसलासं।।

ज्याचा विचार मी
करायला पाहीजे
त्याचा तु का करु
लागलास।।

तुला लिहताना साथ माझी
हाेती मग
मलाच तु का वीसरलासं।।

नक्कीच काही तरी झालयं
तेव्हांच तुझं मन अस भरकटयं।।

मनात एक असत तुझ्या
लिखनात काही वेगळचं
असतयं।।

साथ माझी असताना लीहायचं
तुझ्या मनात नसतयं।।

लीही तु बिंदास्त मनातील
उतरवं भाव मांड तुझे
शब्दांत।।

विचार करु नकाे लीहु कुनावर
पण जमले तर कधी तरी लिही
तुझ्या साठी झीझत आलेल्या
तुझ्या या लेखनी वर।।

तुझ्या या लेखनी वर।।

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार

No comments:

Post a Comment