Friday, 26 September 2014

पुत्र असावा तर शिवबा सारखा

पुत्र असावा तर शिवबा सारखा
मर्द मराठ्यांचा वाघ शोभावा
जसा
मर्द असावा तर वाघा सारखा
जन्मताच ज्याच्या अंगी
शिव शाहीचा धडा
शूर असावा तर शिवबाच्या
मावळ्या सारखा
हर हर महादेव गर्जना
ऐकताच
न सांगता लढण्यास
सज्ज असावा असा
छावा असावा तर
छत्रपती संभाजी राजा न सारखा
मरण आले तरी चालेल
पण शरण जाणार नाही असा
शिवरायांच्या स्वराज्या
साठीच लढणार आणि
वेळ आली तर मारणारा
होय असाच पुत्र व्हावा
या महाराष्ट्र भूमी
ज्या कशाची नसेल
फिकीर
फक्त लढण्यास असेल
सज्ज तो
स्वराज्य साठी लढणारा
आणि स्वराज्या साठीच
लाखो नराधमांना
मातीत मिळवणारा .
आई जगदंबे कृपा असावी
शिवबा राजेंच्या
स्वराज्यात फक्त आणि
फक्त शिव शाही नांदावी
होईल जनता सुखी
तुझा आशीर्वाद तुझी
कृपा असावी
माझ्या मित्रांच्या शिव कार्यास
तूझी प्रेरणा मिळावी .

जय जगदंब
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा .
लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार ...!

No comments:

Post a Comment