Friday, 19 September 2014

उभे आयुष लढला स्वराज्य साठी जिजाऊ चा छावा


उभे आयुष लढला स्वराज्य साठी
जिजाऊ चा छावा
मर्द मराठ्यांचा राजा शोभला
शिवाजी राजा
रांगडे मर्द घडवणारा
सह्याद्रीचा बाप
झाला माझा राजा
गर्वाने भगवा फडकत
स्वराज उभे करणारा
शेर होता जिजाऊ चा छावा

होय गर्वानेच भगवा फडकला राजाने उभ्या आयुष्यात अन्यायाला खत पाणी नाही घातले अन्याय विरुध्द पेटणारा जगातील पहिला राजा जिजाऊ पोटी जन्म ला
उगाच नाही गुण गण गात आम्ही राजाचे पराक्रम आणि धाडस पाहून लाखो मोघल माघार घ्यायचे
अवघे शेकडो मावळ्यांची फौज हजारोंना भारी होती ती घडवली याच शिवाजी राजांनी
कोण येतो अडवा पाहू माझा एक मावळा हजारोंना भारी म्हणताच अंगात शंभर हत्तीचे बळ येत होत
आज हि जा शिवराय बोलता ते बळ येते अंगी
शिवराय या नावातच जादू आहे जे हे नाव कानी पडता अंगातील लाव्हा उसळतो
आणि का नाही उसळणार आज हि तोच पराक्रम राज करतोय इथे आज हि त्याच राजाच गुण गान जय घोष निघतो इथे
गडावर जाताच मुखातून जय शिवराय अलगत निघत वाटत इथेच आहेत राजे गडाच्या पायऱ्या चडत असता कधी गड सर होतो हे कळत देखील नाही हीच जादू आहे जय शिवराय या जय घोषात ..

मुखी नाम माझ्या तुमचे
मनी ध्यान माझ्या तुमचे
मनो मनो पसरीन कीर्ती
तुमची
राजे फक्त हात
असावा माझ्या
माथ्यावरती .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
अजयसिंह घाटगे सरकार
२३.०८.२०१४

No comments:

Post a Comment