Friday, 19 September 2014

मैत्री दिनाच्या शिवशुभेच्छा.


सर्व प्रथम सर्वाना मैत्री दिनाच्या शिवशुभेच्छा.

आज आहे मैत्री दिवस म्हणून आपण आजच मैत्रीचे नाते फुलवायचे आणि आज चा दिवस गेला कि पुन्हा आपणच कोमजवायचे
हि मैत्री नाही मैत्री तर मना मनात असली पाहिजे आणि असायला हवी ,, नाती कोणती हि असो त्या आधी जपली जाते ती मैत्री... मैत्री तून नाती निर्माण होतात नात्यातून मैत्री नाही ..
आजच्या दिवशी आपण शुभेच्छा देतो मना पासून पण ह्याच शुभेच्छा आपल्या क्षणा क्षणाला सोबत राहाव्या ,,
आज मैत्री चा दिवस आहे म्हणून आपली मैत्री किती जवळची आहे हे सांगण्या पेक्षा आपली मैत्री जन्मो जन्मी साथ देईल सोबत असेल हे मनी ध्येय ठेवले पाहिजे , आणि ते तुम्ही ठेवालअशी अपेक्षा आणि खात्री आहे मला .

आणि हे तुमच्या साठी काही शब्द

तुमच्या मैत्री विषयी
काय लिहू
सर्वांच्या पेक्षा जवळची
साथ आहे तुमची मैत्री
सगळ्या पेक्षा खास आहे
तुमची मैत्री
सर्व नात्यांच्या आधी
झाली आहे तुमची
आमची मैत्री
नात्यांच्या पलीकडे
आहे तुमची मैत्री
तुमचे माझ्या जीवनात
मैत्री चे नाते जुळले
ह्याच आहेत खऱ्या
रेशीम गाठी
अशीच सदा सोबत राहो
तुमची मैत्री ..

लेखक
अजयसिंह घाटगे सरकार
०३.०८.२०१४

No comments:

Post a Comment