Friday, 19 September 2014

बळी राजा तू राब राबुनी पिकवितो रे धान.......

बळी राजा तू राब राबुनी
पिकवितो रे धान.......

तुझ्या झोळीत काही नाही
तरीही तू करतो हिरवे रान.......

कुणाला आहे तुझी
कळकळ
झाले खात महाग
बळी राजा तू राब राबुनी
पिकवितो रे धान......

दिस रात तू कष्ठ करुनी
पिकवितो रे धान
आज इथे स्वार्थ
पोटी
कोण गात नाही
तुझे गुण गान
बळी राजा तू राब राबुनी
पिकवितो रे धान ...

तुझ्या कष्टातून
मिळते भाकर
कसे समजउ सांग
बळी राजा तू राब राबुनी
पिकवितो रे धान ...

लेखक
अजयसिंह

No comments:

Post a Comment