Friday, 26 September 2014

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे


आग्रा भेटी वेळी
भर सभेत
दुष्मनाच्याच दरबारात
दुष्मनाला फटकारनारा
या जगातील एकमेव राजा
म्हणजेच छत्रपती शिवराय .!

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

अजयसिंह...!

मराठ्यांचा आवाज

मराठ्यांचा आवाज
कानावर जरी पडला
तरी
मोघल म्हणायचे
मराठे आले पळा पळा
वाकडे जाल तर
आज हि
तुमची ही तीच स्थिती
होईल
जरा सांभाळून
आम्हा मराठ्यांचा आहे
नाद खुळा
जास्त विचार करू नका
बस एव्हडेच जाणा
आमचा आहे इतिहास
रक्ताने माकलेला
तुम्हाला सहन नाही
व्हायचा तो जरा
जपून रहा.....!

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा .

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार

मराठ्याची रणराघीनी


मराठ्याची रणराघीनी
जिजाऊची वाघीण हाय
डोळ्यात आग हिच्या
रक्तात स्वभिमान हाय
अंगात शौर्य
रक्तात धमक हाय
मर्द मराठ्याची
रणराघीनी हि
चेहऱ्यावर तलवारीच्या
पात्यागत तेज हाय ..

जय जिजाऊ
जय शिवराय .!

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार

ना किसी के प्यार मै है


ना किसी के प्यार मै है
ना किसी के दिलदार है
ना किसी कि याद मै
जिते है
हम तो अपनी मर्जी के
साये मै रहते है.... !

अजयसिंह ...!

का अस केलसं का तू


का अस केलसं
का तू
मन माझं तोडलस
तुझ्या पेक्षा हि
सुंदर सुंदर
मुली आल्या
पण मन माझं
तुझ्यातच गुंतलं
मी तुझ्याच
मला पाहिलं
मी तुलाच आपल मानलं
तरी तू असं
असं का केलंस
तुझ्या वर मनापासून
प्रेम करून देखील
तू मन माझं तोडलस
काही वाटलं नाही का
तुला
थोडा विचार नाही
केला का माझा
कि तुझ प्रेम
म्हणजे एक टाइम पास होता
माझ्या सोबत खेळलेला
खेळ होता ??

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार

जंगल मै शेर का और महाराष्ट्र मै मराठो का हि राज चलता है

जंगल मै शेर का
और महाराष्ट्र मै
मराठो का हि राज
चलता है

आले गेले मातीती
गाढले
या स्वराज्यावर वाकड्या
नजरेने पहिलेल्यांच्या
छाताडावर बसून
भगवे निशाण फडकविले ..
जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा ..

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे

मुखात जय शिवराय ध्यानात जय शिवराय

जय शिवराय

मुखात जय शिवराय
ध्यानात जय शिवराय
मनात जय शिवराय
जय घोषात जय शिवराय
जगात ज्यांची कीर्ती
आहे महान
तेच आहेत छत्रपती शिवराय
आदर्श राजे महान .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक-कवी

जिथे मिळतो आशीर्वाद शिवरायांचा तिथेच घडतो मावळा स्वराज्याचा....

जिथे मिळतो आशीर्वाद
शिवरायांचा
तिथेच
घडतो मावळा स्वराज्याचा....
राजे मुजरा आपणास मानाचा मुजरा
आहात तुम्हीच
स्वराज्याची शान
राजे
तुम्हीच आहात
महान
किती हि गुण गाईले तरी
नाही
संपणार तुमचे गाऊन गुण गान
आयुष संपेल पण
सांगून नाही संपणार तुमचा इतिहास .......
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभू राजे
जय मराठा .
लेखक -कवी
अजयसिंह घाटगे सरकार

हजारोंचे लाखो होणे सोपे नाही

जय शिवराय
एकच राजे छत्रपती माझे
एका शब्दावर
हजारोंचे लाखो
होणे सोपे नाही
लाख नाही झाले तरी
हजारोंच्या अंगात
लाखोंचे बळ
यायचे
म्हणून म्हणतो
छाती वर घाव झेलणारी मराठ्याची
जात .

जय जिजाऊ
जय शिवराय
अजयसिंह घाटगे

क्या करू उनसे प्यार करे

क्या करू उनसे
प्यार करे
जिनको प्यार का
मतलब हि मालूम नही........
अजयसिंह

ना हक है

ना हक है
आपका ना हक
है मेरा
प्यार मै
हक है एक दुजे पे
अपना.

अजयसिंह.....!

पुत्र असावा तर शिवबा सारखा

पुत्र असावा तर शिवबा सारखा
मर्द मराठ्यांचा वाघ शोभावा
जसा
मर्द असावा तर वाघा सारखा
जन्मताच ज्याच्या अंगी
शिव शाहीचा धडा
शूर असावा तर शिवबाच्या
मावळ्या सारखा
हर हर महादेव गर्जना
ऐकताच
न सांगता लढण्यास
सज्ज असावा असा
छावा असावा तर
छत्रपती संभाजी राजा न सारखा
मरण आले तरी चालेल
पण शरण जाणार नाही असा
शिवरायांच्या स्वराज्या
साठीच लढणार आणि
वेळ आली तर मारणारा
होय असाच पुत्र व्हावा
या महाराष्ट्र भूमी
ज्या कशाची नसेल
फिकीर
फक्त लढण्यास असेल
सज्ज तो
स्वराज्य साठी लढणारा
आणि स्वराज्या साठीच
लाखो नराधमांना
मातीत मिळवणारा .
आई जगदंबे कृपा असावी
शिवबा राजेंच्या
स्वराज्यात फक्त आणि
फक्त शिव शाही नांदावी
होईल जनता सुखी
तुझा आशीर्वाद तुझी
कृपा असावी
माझ्या मित्रांच्या शिव कार्यास
तूझी प्रेरणा मिळावी .

जय जगदंब
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा .
लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार ...!

हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे

हे लिहताना हि दुख: होतंय कारण छत्रपतींच्या नावाने आणि छत्रपतींच्या पोस्ट करणाऱ्या महाशयांना छत्रपतींचा इतिहास माहित नाही ..
कारण आज हा महाराष्ट्र कुणाचा आहे या वरून ज्या पोस्ट केल्या जातात त्या वाचून देखील मला आनंद नाही तर दुख: होतंय कारण आपण समजू शकलो नाही छत्रपतींना तुम्ही समजू शकला नाही छत्रपतींना .. तुम्ही कसे समजू शकणार रे त्यांना त्यांच्या चार पोस्ट इकडून तिकडून कॉपी करून टाकल्या कि झालो आम्ही शिवभक्त हे डोक्यात घेणार्यांनी पहिला छत्रपतींचा इतिहास वाचला पाहिजे त्यांच्या इतिहासाचे धडे घेतले पाहिजेत .. आणि मगच सांगावे कि हा महाराष्ट्र कुणाचा आहे आणि कसा त्या छत्रपतींनी घडवला आहे..
आज हि मी हेच सांगीन
जे कायम सांगत आलो
आहे
हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे
आणि त्यांचाच असेल
या महाराष्ट्रा साठी
शिवरायांनी दिस रात केली
आहे
हा महाराष्ट्रा त्यांनीच घडवला आणि
वाढवला आहे .

जय जिजाऊ
जय शिवराय ..
लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार ..

नका रे नका जाऊ वाकडे होतील बेभान मराठे

नका रे नका
जाऊ वाकडे
होतील बेभान
मराठे
नाही उरणार पळाय
जागा
नाही मिळणार रहायला
जागा .
जय हो मराठा

अजयसिंह घाटगे ..... !

मान्य आहे आजची नारी रणराघिनी झाली पाहिजे

मान्य आहे आजची नारी रणराघिनी झाली पाहिजे
पण आजच्या नारी कडे पहिले तर वाटते कि कशाला काढल्या सावित्री फुलेंनी मुलींच्या शाळा .. कशाला शिकवल्या मुली.. याच कारण असे आहे कि आज इथे कुणाला जिजाऊ बनणे पसंद नाही आज करीना कटरीना आणि कोण कोण बनणे पसंद आहे ..
आणि मुलीनी हि हा विचार करावा कि तुमच्यातील नारी शक्ती . कुण्या हि पुरश्याच्या शक्ती पेक्षा कमी नाही ..
त्या नट्या सारख्या वागाल तर त्यात तुमची हि चूक आहे ..
अजयसिंह घाटगे सरकार

पण शिवराय हे एकच जाहले ज्यांच्या पराक्रमाने हे हिंदवी स्वराज्य घडले .

होऊन गेले कैक इथे
होतील हि कैक इथे
पण शिवराय हे एकच
जाहले
ज्यांच्या पराक्रमाने हे
हिंदवी स्वराज्य घडले .

जय जिजाऊ
जय शिवराय
लेखक-कवी
अजय घाटगे सरकार
२६.०९.२०१४

Friday, 19 September 2014

मैत्री दिनाच्या शिवशुभेच्छा.


सर्व प्रथम सर्वाना मैत्री दिनाच्या शिवशुभेच्छा.

आज आहे मैत्री दिवस म्हणून आपण आजच मैत्रीचे नाते फुलवायचे आणि आज चा दिवस गेला कि पुन्हा आपणच कोमजवायचे
हि मैत्री नाही मैत्री तर मना मनात असली पाहिजे आणि असायला हवी ,, नाती कोणती हि असो त्या आधी जपली जाते ती मैत्री... मैत्री तून नाती निर्माण होतात नात्यातून मैत्री नाही ..
आजच्या दिवशी आपण शुभेच्छा देतो मना पासून पण ह्याच शुभेच्छा आपल्या क्षणा क्षणाला सोबत राहाव्या ,,
आज मैत्री चा दिवस आहे म्हणून आपली मैत्री किती जवळची आहे हे सांगण्या पेक्षा आपली मैत्री जन्मो जन्मी साथ देईल सोबत असेल हे मनी ध्येय ठेवले पाहिजे , आणि ते तुम्ही ठेवालअशी अपेक्षा आणि खात्री आहे मला .

आणि हे तुमच्या साठी काही शब्द

तुमच्या मैत्री विषयी
काय लिहू
सर्वांच्या पेक्षा जवळची
साथ आहे तुमची मैत्री
सगळ्या पेक्षा खास आहे
तुमची मैत्री
सर्व नात्यांच्या आधी
झाली आहे तुमची
आमची मैत्री
नात्यांच्या पलीकडे
आहे तुमची मैत्री
तुमचे माझ्या जीवनात
मैत्री चे नाते जुळले
ह्याच आहेत खऱ्या
रेशीम गाठी
अशीच सदा सोबत राहो
तुमची मैत्री ..

लेखक
अजयसिंह घाटगे सरकार
०३.०८.२०१४

नमन तुला शिवराया मी तुझेच गुन गान गातो !!

जय शिवराय

नमन तुला शिवराया
मी तुझेच गुन गान गातो !!

सांगतो तुझी महिमा
मी तुलाच मुजरा करतो!!

नमन तुला शिवराया
मी तुझेच गुन गान गातो !!

नाही झाला
नाही होणार तुझ्या
सारखा योद्धा!!

तुझ्याच पराक्रमामुळेच
मी गर्जा महाराष्ट्र
म्हणतो !!

नमन तुला शिवराया
मी तुझेच गुन गान गातो !!

तुझ्या पराक्रमाला
तोड नाही
जिजाऊ आईची शिकवण
तुला !!

अन्याय काही सहन नाही
केला
महाराष्ट्र साकार केला तू !!

नमन तुला शिवराया
मी तुझेच गुन गान गातो !!

तू आहेस महान योद्धा !!

नमन तुला शिवराया
मी तुझेच गुन गान गातो !!

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक_कवी
अजय घाटगे सरकार

जय शिवराय


जय शिवराय

स्वराज्याचे वाली तुम्ही
स्वराज्य स्थापन करणारे
स्वराज्य निर्माते तुम्ही
शिकवले तुम्ही स्वराज्या साठी
झगडणे स्वराज्या साठी
तुमच्या छाव्याने
मरणालाही माघारी
पाठवले ....
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक_कवी
अजयसिंह घाटगे सरकार
०४.०८.२०१४

स्वराज्याचा वाली शिवनेरी वर जन्माला


स्वराज्याचा वाली
शिवनेरी वर जन्माला
डोल ताशांचा आवाज घुमू
लागला
समजताच मोघनाला
घाम आला
बघ फितुरा वाघ
सह्याद्रीच्या दऱ्या खोर्यात
गर्जू लागला .

जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा

लेखक
अजयसिंह

वीर जवान तुझे सलाम

वीर जवान तुझे सलाम
लढताय तुम्ही
देशा साठी कुर्बान होताय तुम्ही
रक्ताने भारत भूमी
पावन करताय तुम्ही
म्हणून आज इथे आनंदात
राहतोय सर्व आम्ही

शहीद कुंडलिक माने यांना भावपूर्व आदरांजली

उपकार फेडलेस तू
कुंडलिका
तुझ्या रक्ताने माती पावन
केलीस तू कुंडलिका
भारत मातेचा वीर पुत्र तू
भारतमाते साठीच
अमर झालास तू
कुंडलिका
सलाम माझा तुला कुंडलिका
माझा सलाम तुझ्या कीर्ती ला
कुंडलिका .

लेखक
अजयसिंह

शिव सकाळ मुजरा राज मुजरा


शिव सकाळ
मुजरा राज मुजरा
तुमच्या पुढे काहीच नाही
मोठे
तुम्हीच साऱ्या जगाचे
राजे
राज मुजरा आपणास
तुम्हीच या महाराष्ट्राचे
भाग्य विधाते .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा .

लेखक
अजयसिंह

नात बहिण भावाच काही वेगळेच असत


नात बहिण भावाच काही वेगळेच
असत
कधी रुसव कधी हसर असत
रक्षा बंधन दिवशी
हक्काने काही मागायचं
असत
नात बहिण भावाच नात काही वेगळंच
असत
आई ने रागावल तर बहिणीने
वाचवलेल असत
बाबांच्या राग पुढ
बहिणच नातच पुढ असत
खूप काही आहे लिहिण्या
साठी या नात्यावर
तरी जास्त काही लिहणार नाही
माझ्या बहिणींना सुखात ठेव
या पलीकडे आज मी हि काय मागणार
नाही ..

लेखक
अजयसिंह

इतिहास म्हंटले तरी तुम्हीच दिसता राजे


जय शिवराय

इतिहास म्हंटले
तरी तुम्हीच दिसता
राजे
इतिसाच्या
पाना पानावर
तुमचाच पराक्रम
कोरला आहे
राजे
जो पर्यंत हि
धरती असेल
तो पर्यंत
तुमचाच इतिहास
राज करील राजे .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
अजयसिंह घाटगे सरकार

मर्द महाराष्ट्राचा छावा जिजाऊचा

मर्द महाराष्ट्राचा
छावा जिजाऊचा
नडला एकटा वाघ
तोच शिवछत्रपती
साऱ्या सह्याद्रीचा बाप .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय महाराष्ट्र .

लेखक
अजयसिंह घाटगे सरकार

ना माझ्या राजाला सोन्याच मंदिर आहे ना दगडाच मंदिर आहे

ना माझ्या राजाला सोन्याच मंदिर आहे ना दगडाच
मंदिर आहे
आर गरज नाही माझ्या राजाला सोन्याच्या मंदिरा ची माझ्या राजाला होती रायातच सोन्या पेक्षाही प्यारी आज हि माझ्या राजाच मंदिर नाही कारण वाघ होता माझा राजा मोघलांना सळो कि पळो करून सोडणारा शेर होता माझा शिवबा राजा
रयते साठी लढला रयते साठी झगडला लहान भूक सोडून रणांगणात कडाडला स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती जणू स्वराजच आपले घर आणि स्वराज्यच आपला दरबार होता माझ्या राजा साठी
त्या त्या औरंग्याची तरी काय ख्याती माहित होता त्याला हि कोथळा काढलाय सह्याद्रीच्या वाघान
प्रताप गडाच्या पायथ्याशी
आले जरी चालून किती हि माघारी नाही गेले ते स्वराज्य वर ज्यांनी ज्यांनी डोळा ठेवला मातीत गाढले कैक सारे .

झाले कैक या
धरती वरीती
पुन्हा शिवबा राजे
फेडिला पांग या
मातीचा स्वराज्य स्थापन
केले
नाही झाले पुन्हा राजे
होते तेच एक राजे
होणार नाही पुन्हा
शिवबा राजे
स्वराज्य साठीच
ते लढले ..

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
अजयसिंह

भगव्याचे भक्त आम्ही आम्हाला फिकीर नाही कशाची


भगव्याचे भक्त आम्ही
आम्हाला फिकीर नाही
कशाची
भगव्या साठी लढतो
स्वराज्या साठी झगडतो
आम्ही
मर्द मराठे आहोत
हजारोशी एकटा झुंजणाऱ्या
आणी मरणाला हि पायदळी
तुडवणाऱ्या शंभूचे
छावे आहोत आम्ही .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
अजयसिंह घाटगे सरकार

बळी राजा तू राब राबुनी पिकवितो रे धान.......

बळी राजा तू राब राबुनी
पिकवितो रे धान.......

तुझ्या झोळीत काही नाही
तरीही तू करतो हिरवे रान.......

कुणाला आहे तुझी
कळकळ
झाले खात महाग
बळी राजा तू राब राबुनी
पिकवितो रे धान......

दिस रात तू कष्ठ करुनी
पिकवितो रे धान
आज इथे स्वार्थ
पोटी
कोण गात नाही
तुझे गुण गान
बळी राजा तू राब राबुनी
पिकवितो रे धान ...

तुझ्या कष्टातून
मिळते भाकर
कसे समजउ सांग
बळी राजा तू राब राबुनी
पिकवितो रे धान ...

लेखक
अजयसिंह

नाही भावा हा भगवा माझ्या शिरावर आहे तो फक्त माझ्या राजाचा आहे

नाही भावा हा भगवा माझ्या शिरावर आहे तो फक्त माझ्या राजाचा आहे
माझ्या राजाने रक्ताच पाणी करून फडकला आहे
असा तसा कुण्या पक्षाचा घेत नाही मी शिरावर
घेतो आणि घेतच राहणार माझ्या राजाचा भगवा
पक्ष काय आता निर्माण झाल्यात रे
माझ्या राजाचा भगवा तर ३५० वर्षा पासून फडकतोय
तो कसा सोडीन मी तो सोडून स्वार्थी कसा होईन मी
नाही होणार रे मी कुण्या ऐर्या गैर्याचा गुलाम
हे शरीर फक्त माझ्या राजाच्या कृपेने आहे
आणि ह्यावर फक्त माझ्या शिव-शभूंचा
हक्क आहे
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
अजयसिंह

यमाला हि कोड पडल असेल घेऊन जाताना माझ्या शंभूराजाला


यमाला हि कोड पडल असेल
घेऊन जाताना माझ्या शंभूराजाला
त्याने हि विचार केला असेल
घेऊन जाताना या मराठ्याच्या
छाव्याला
पाहून त्यांचे ही अंग थर थरल असेल
मरणाशी झुंज देणाऱ्या या वाघाराला
हाच
विचार करून तो ही थकला
असेल
कसा घडवला असेल या शिवबाच्या
छाव्याला ..

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार
१६.०८.२०१४

झाले अनेक या भूमी

झाले अनेक या भूमी
पण रयतेला पोटच्या
पोरावानी सभाळले
ते फक्त शिव छत्रपतींनी
नाही कोणी कळकळ
केली रयतेची केली
ती माझ्या राजा शिवछत्रपतींनी

युगे युगे ऐसा नाही
झाला राजा
रयतेला पोरवाणी जपणारा
रयतेच्या सुखात आपले
सुख शोधणारा
झाला तोच जिजाऊ चा
छावा शिवछत्रपती
जगातील पहिला असा राजा .

जय जिजाऊ
जय शिवराय

लेखक
अजयसिंह घाटगे

सह्याद्रीच्या काना कोपऱ्यात नाद गुंजला महाराष्ट्र माझा


शिव संध्या
सह्याद्रीच्या काना कोपऱ्यात
नाद गुंजला महाराष्ट्र माझा
दाही दिशा एकटा झुंझाला
तो शंभूराजा माझा
नाव ऐकताच हजारोंना
घाम यायचा तोच मराठा छावा
शंभूराजा
संभाजी हे नाव ऐकल्यावर
औरंगजेबची गादीच नाही
तर पाया खालील जमीन हि सरकायची
तोच हा मराठा छावा शंभूराजा ..

जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
अजयसिंह घाट

एक एक मावळा जमउन वीर स्वराज्या साठी लढला

जय शिवराय

शिव सकाळ

एक एक मावळा
जमउन
वीर स्वराज्या साठी
लढला
माती साठी खर्ची
जाणारा मावळा
फक्त शिवरायांच्या
आखाड्यात घडला

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
अजयसिंह घाटगे

शिव भक्तांनो आणि शिव प्रेमींनो तुमच्या शिव कार्याला सलाम

शिव भक्तांनो आणि शिव प्रेमींनो
तुमच्या शिव कार्याला सलाम
पण एक खंत आहे काही शिव भक्त आपल्या मुखातून खूप वाईट असे शब्द काढतात .. त्या शब्दाला तेव्हडा आवर घालावा .. शिव शाही चा प्रसार आपण मनातून रुजवला पाहिजे आणि तो मनातून रुजाव्याच्या प्रयत्न करू शिव्या देऊन प्रसार करण्या पेक्षा प्रेमाने योग्य तो सल्ला देऊन करू .. आडवे येतील खूप आपल्या पण त्यांना पहिला प्रेमाने सांगू .. काय असत काहीना प्रेमाची भाषा कळते तर काहीना टोणग्या . पण खरे शिव प्रेमी आणि शिव भक्त आपण थोडा विचार करून निर्माण करू जेणे करून त्यांच्या काढून खरी शिव भक्ती आणि शिव कार्य होईल .. काही आहेत नादान त्यांना नाही नीट बोलता येत त्यांच्या कडे दुर्लक्ष केलेलं योग्य आहे त्यांना नाही माहित काय आहे इतिहास कसा घडवला आहे .. म्हणून ते उलट सुलट बोलत असतील .. पण त्यांना जेव्हा समजेल आपले कार्य तेव्हा तेही आपल्या सोबतच येतील
शिव भक्त / प्रेमी आहोत आपण आपल्या हातून कधी काही चूक नाही झाली
पाहिजे हि काळजी घ्याव आपल्या राजेंनी असे शिव्या वैगरे देऊन नाही स्वराज्य उभे केले नाही .. कधी प्रेमाने तर कधी क्रोधाने केले आहे निर्माण हे स्वराज्य .... दुसर्याच्या आई ला आई आणि बहिणीला बहिण मनात होते ..........मग आपण शिव्या वैगरे देऊन काही मूर्खाच्या नादी लागून ती चूक कशी करू शकतो ........ आपण हि शिवरायांच्या वारसा चालवत आहोत .. मग जसे शिवरायांनी स्वराज्य घडवले तसे नाही घडवणार पण तसे चालू तरी शकतो आपण
विचार करू थोडा
शिव भक्ती असो
वा समाज कार्य
सर्व आपलेच आहे
स्वराज्य आपले
महाराष्ट्र
आपला आहे
सर्वाना सोबत घेऊन चालू
जे येतील ते येतील
राहतील ते राहतील
मुजरा करू शिव छत्रपतींना
आणि शिव कार्यास सुरवात करू ..

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
तुमचाच मित्र
अजयसिंह

सांगू राजे तुमचा इतिहास छाती ठोकून आम्ही

जय शिवराय

शिव सकाळ

सांगू राजे तुमचा इतिहास
छाती ठोकून आम्ही
तुमच्या इतिहासाची
गाथा
तमा नाही कशाची
त्याला
तुम्हीच दाखवल्या या
महाराष्ट्राला सुवर्ण वाटा..

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
अजयसिं

तुझ्या प्रेमासाठी मी वन वन फिरलो

तुझ्या प्रेमासाठी मी
वन वन फिरलो
जवळ असून हि
त्याला ओळखू नाही
शकतो
जवळच होतीस तू
पण प्रेमा साठी
मी दूर राहिलो
मनात प्रेम असून हि
बोलू नाही शकलो
होते तुझे हि प्रेम माझ्यावर
पण तुला विचारू नाही शकलो
तुझ्या साठी जगून
शेवटी तुझ्याच दूरच राहिलो ..

लेखक
अजयसिंह

जय जिजाऊ


मुलगी असावी तर अशी
जिची नजर
तेजस्वी धारे जशी
जिजाऊची वाघीण
शोभावी जशी
नराधमांच्या छाताडावर
पाय ठेऊन उभी राहणारी
हीच होईल अशी ती मुलगी .

जय जिजाऊ
जय शिवराय .

लेखक
अजयसिंह

जय हो राजा शिव छत्रपती

जय हो राजा शिव छत्रपती

रणीझुंझारनारे वीर घडवले
तुम्ही
माघार न घेणारे वाघ घडवले
तुम्ही
सह्याद्री साठी मरण पत्करणारे
मर्द घडवले तुम्ही
या स्वराज्य साठी
लढणारे मर्द मावळे
घडवले तुम्ही
महान राजे तुम्ही महान
तुम्हीच स्वराज्याचे शिल्पकार राजे
तुम्हीच या महाराष्ट्राची शान.

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे .

लेखक
अजयसिंह घाटगे सरकार

नाही संपणार गुण गाऊन तुमचे

शिव संध्याकाळ

नाही संपणार गुण गाऊन
तुमचे
असा आहे तुमचा इतिहास
नाही होणार कोणी तुमच्या सारखा
असा आहे तुमचा पराक्रम

किती हि सांगितल
तरी नाही संपत
तुमचा इतीहास
तुमच्या
इतिहासाला कसलीच सीमा नाही
नाही तमा राजे

अजून हि नाव घेता तुमचे
गर्वाने फुलते छाती
हो राजे गर्वाने आणि अभिमानाने
फुले इथल्या मराठ्यांची छाती

राजे
होता तुम्ही महाराष्ट्राचे वाली
गरिबांचे कैवारी
आज हि राज करते या
जगावर तुमची शिवशाही ..

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
अजयसिंह घाटगे सरकार

उभे आयुष लढला स्वराज्य साठी जिजाऊ चा छावा


उभे आयुष लढला स्वराज्य साठी
जिजाऊ चा छावा
मर्द मराठ्यांचा राजा शोभला
शिवाजी राजा
रांगडे मर्द घडवणारा
सह्याद्रीचा बाप
झाला माझा राजा
गर्वाने भगवा फडकत
स्वराज उभे करणारा
शेर होता जिजाऊ चा छावा

होय गर्वानेच भगवा फडकला राजाने उभ्या आयुष्यात अन्यायाला खत पाणी नाही घातले अन्याय विरुध्द पेटणारा जगातील पहिला राजा जिजाऊ पोटी जन्म ला
उगाच नाही गुण गण गात आम्ही राजाचे पराक्रम आणि धाडस पाहून लाखो मोघल माघार घ्यायचे
अवघे शेकडो मावळ्यांची फौज हजारोंना भारी होती ती घडवली याच शिवाजी राजांनी
कोण येतो अडवा पाहू माझा एक मावळा हजारोंना भारी म्हणताच अंगात शंभर हत्तीचे बळ येत होत
आज हि जा शिवराय बोलता ते बळ येते अंगी
शिवराय या नावातच जादू आहे जे हे नाव कानी पडता अंगातील लाव्हा उसळतो
आणि का नाही उसळणार आज हि तोच पराक्रम राज करतोय इथे आज हि त्याच राजाच गुण गान जय घोष निघतो इथे
गडावर जाताच मुखातून जय शिवराय अलगत निघत वाटत इथेच आहेत राजे गडाच्या पायऱ्या चडत असता कधी गड सर होतो हे कळत देखील नाही हीच जादू आहे जय शिवराय या जय घोषात ..

मुखी नाम माझ्या तुमचे
मनी ध्यान माझ्या तुमचे
मनो मनो पसरीन कीर्ती
तुमची
राजे फक्त हात
असावा माझ्या
माथ्यावरती .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
अजयसिंह घाटगे सरकार
२३.०८.२०१४

वाचवा शिवकाळ


शिव सकाळ
वाचवा शिवकाळ
सांगावा शिवकाळ
समजावा शिवकाळ
समजवावा शिवकाळ
आचरणात आणावा शिवकाळ

जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
जय मराठा

अजयसिंह घाटगे

तुम्ही आल्यावर वादळ येत असतील पण आमच्या फक्त नावानेच वादळ निर्माण होतात

तुम्ही आल्यावर वादळ येत असतील
पण आमच्या फक्त नावानेच वादळ निर्माण होतात

तू फिक्र ना कर मराठे
शिवबा का खून है तू
शिवबा के आखाडे मै
पैदा हुआ मर्द है
झुक मत किसीके सामने
सिर्फ लढणा और दुश्मन
को मिट्टी मै गाढना सिख ले तू .

जय शिवराय

अजयसिंह घाटगे

जय शिवराय


जय शिवराय

वाचता इतिहास येतो अंगावर
काटा
सांगता इतिहास उसळतो अंगातील
रक्ताचा लाव्हा
तुमचा इतिहासचं असा आहे राजे
मरताना हि निघेल मुखातून तुमची
शिव गर्जना ..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
अजयसिंह घाटगे
२५.०८.२०१४
९७६२८७९८८९

छत्रपती संभाजी राजे,

छत्रपती संभाजी राजे,
या जगाच्या पाठीवर असा एकच योद्धा झाला की जो एक हि लढाई नाही हरला ,जेव्हा पासून कळाय लागल तेव्हा पासून शिवरायांच्या सोबत मोघलांशी सामना करायचे शंभूराजे उभ्या हय्यातीत औरंगजेब महाराष्ट्र जिंकू नाही शकला . ते याच शंभू राजाच्या पराक्रमा मुळे याच शंभू राजाच्या धैर्या मुळे याच शंभू राजाच्या धाडसा मुळे .. कोणी सांगितले राजे मोघल येत आहेत राजे मोघल येत आहेत .. त्यांना एकच उत्तर असायचे येऊ दी कि किती यायचं आहे त्यांना ते त्यांच्या पुढे समोर हा शंभू खडा हाय . आणि याच राजाचा शब्दावर शेकडो मावळ्यांचे लाखो मावळे कधी व्हयाचे हे त्यांना हि कळत नसे ..संभाजी राजांचे
कानून म्हणजे सर्वात कडक कानून होते . ते कोणाला आवडत नसे कारण संभाजी राजांनी शब्द टाकला कि तो मागे नाही यायचा ..याच मुळे संभाजी राजांचे शत्रू निर्माण व्हयाचे .. पण कानून होते कडक म्हणून संभाजी राजे मोघलांशी धाडसाने सामना करायचे.. अरे याच राजाने आग्रातून शिवरायांची सुटका केली होती अवघ्या नऊ वर्षाच्या छाव्याने याच महाराष्ट्रा साठी स्व:ताचा जीव धोक्यात घालून या महाराष्ट्राला सुवर्ण किरणे दाखवणाऱ्या शिवरायांच्या हातात हात देऊन सांगितले......... कि आबा साहेब आमच्या पेक्षा या महाराष्ट्राला आपली जास्त गरज आहे ...........हे धाडस हे धैर्य आणि शौर्य आलं कुठून आलं ते याच महाराष्ट्राच्या मातीतून याच महाराष्ट्राच्या मातीती वाढला होता छावा सह्याद्री च्या कुशीत बगाडला होता शंभू छावा .. उगाच म्हणत नाहीत छावा जिवंत सिंहाचे दात मोजायला हि कमी नाही केले या शंभू राजाने .. सिंहाच्या जबड्यात हात घालूनी दात मोजती ही जात मराठ्याची हे वाक्य काय उगाच नाही मुखात येत आमच्या पराक्रम आणि धाडस शंभू राजाचा होत म्हणूनच हे वाक्य येत मुखात
..........घात केला आपल्यांनी नाही तर कोण इंग्रज आणि कोण पोर्तुगीज कोणाची पहायची ही हिम्मत झाली नसती या स्वराज्यावर
शंभू राजे हे नाव ऐकताच मोघलांच्या बादशाची गादीच नाही तर पाया खालची जमीन सरकायची .. ही जात मराठ्याची होती कुणी अन्याय केला कि त्याला तिथेच चिरून काढायचे धाडस होते या राजाचे . अन्याय आपल्या सग्या सोयऱ्याने जरी केला तरी त्याला शिक्षा ही व्हायचीच
छावा होता शिवरायांचा वाघ होता वाघा सारखेच जगाला मरण आले पण शरण नाही गेला ... अर्र जाईल तर कसा शिवरायांचा छावा होता अक्खा महाराष्ट्र हवाली केला होता शिवरायांनी .. स्वराज्या चा रक्षण करता होता शिकवण शिवरायांनी दिली होती मरण आले तरी चालेल पण शरण नाही जायचे आणि तेच केले आवडत नसे शंभू राजांना माघार घेणे आणि याच धाडशी गुना मुळे शंभू राजे मोघलांच्या कळपात सापडले गेले . जरी सापडले गेले तरी मराठा बाणा आणि ताठ कणा नाही सोडला राजांनी ......जीभ छाटली डोळे काढले हात छाटले पाय तोडले शीर छेद केले तरी ही शरण न गेलेला ..... या जगातील पहिलाच राजा होता ज्याच नाव होत संभाजी
तरी ही आज या राजाचा इतिहास आपल्याला माहित नाही
कोणी तरी येत काही ही सांगत निघून जात आपण त्याच्या बोलण्यावर वर विस्वास ठेवतो कोणी हे येत संभाजी राजा असा होता तसा होता संभाजी राजांनी हे केलं ते केलं सांगितले कि त्याच्या बोलण्यावर विस्वास ठेऊन आपण एका महान योध्यावर ना ना तरेच्या फायरी झाडल्या आपल्याला काही वाटल कस नाही .........या अश्या महान योध्यावर फायरी झाडायला लाज कशी वाटली नाही असं बोलताना माहित का इतिहास या राजाचा माहित आहे का कसा होता इतिहास या राजाचा आणि जर माहित नसेल तर माहित करून घेतल्या शिवाय जर आपण फायरी झाडल्या असतील तर मूर्ख कोण ते इतिहास लिहिणारे मंत्री कि आपण ???
अरे या शंभू राजा मुळे हे स्वराज्य राखले गेले हा इतिहास पण नाही पहिला कधी मूर्खाच्या नादी आणि त्या चुकीच्या इतिहासावर भरोसा करत गेलो ही चूक कुणाची आपली कि आणखी कुणाची ?
अरे ज्याचा इतिहास वाचताना देखील आमच्या डोळ्यातून पाणी वाहत अंगात रक्ताचा लाव्हा उसळतो
या राजा विषयी बोलताना देखील आमच्या डोळ्यासमोर तो ३५० वर्षा पूर्वीचा इतिहास दिसतो दिसत ते धाडस दिसत ते धैर्य दिसतो तो पराक्रम . त्याच राजाचा इतिहास माहित करून घ्यायच सोडून आपण नको ते बोलत गेलो .आज ही तुळा पुरी जाऊन पाहावे त्या मातीती ही या राजाच्या रक्ताचा सुघंध येईल विचारावे ह्या सह्याद्रीला ती ही आज हेच सांगेल कि संभाजी हा शिवबाचा छावा शोभला...
तरी हि आम्हाला माहित नाहीत शंभू राजे तरी हि आम्हाला माहित नाही संभाजी राजेंचा पराक्रम
मग आम्हाला माहित तरी काय आहे ??
ज्या मंत्र्यांनी खोटा इतिहास लिहून आपल्या समोर सादर केला तो इतिहास आम्हाला तोंड पाठ आहे
का तो तोंड पाठ आहे कारण आम्ही कधी खऱ्या इतिहासाच्या मुळा पर्यंत गेलोच नाही .....कधी तो जाणलाच नाही कधी हा विचार हि केला नाही कि आपण जी इतिहासाची पाने चाळली आहेत किंवा कुणाच्या तरी तोंडून ऐकला आहे तो खरा आहे कि नाही याची कल्पना ही नाही आपल्याला
पण एक मन सांगते की आपण कधी इतिहासाच्या मुळा पर्यंत गेलोच नाही
कारण इतिहास जाणून तरी काय करणार आहोत आपण आपले थोडीच कोण आहेत ते
त्यांनी स्वराज्य निर्माण केले ते स्वत: साठी केले नाही हे माहित असून ही आपण अश्या
चुकीच्या इतिहासावर विस्वास ठेवत गेलो आणि बदनाम करत गेलो संभाजी राजांना
ज्याने कधी त्याचा विचार ही केला नसेल असे शब्द वापरात गेलो की संभाजी राजाचे नावच नाही तर पूर्ण संभाजी राजाच बदनाम होत गेला .
ज्या मंत्र्यांनी संभाजी राजांना सतत त्रास दिला त्यांचा इतिहास माहित नाही आपल्यांना
मराठे लढत होते मराठे मरत होते मराठे भगवा फडकत होते आणि हे मंत्री इतिहास लिहित होते मराठे निरक्षर होते लिहत वाचता येत नसे त्यांना त्यांना फक्त लढणे आणि स्वराज्य साठी लढणे हेच माहित असे आणि याच निरक्षर मराठ्यांच्या निरक्षर पनाचा वापर करून राज दरबारी खाऊन मातलेले हे मंत्री चुकीचा इतिहास पसरवत होते हे आपल्या लक्षात आहे त्यांनी चुकीच सांगितले हे आपल्याला माहित आहे .. मग माझ्या शंभू राजाचा खरा इतीहास का माहित नाही आम्हाला . का गेलो नाही आपण खऱ्या इतिहासाच्या मुळा पर्यंत कधी आपण गेलो नाही
चुकीच्या वर विस्वास ठेवण्या खेरीच आपण काही केले नाही
वर म्हणतो आणि महाराष्ट्रीयन कशाला आणि का म्हणतो अपना स्वताला महाराष्ट्रीयन ..हाच महाराष्ट्र मर्द माणसांचा मुलुख म्हणून ओळखला जातो हे तरी माहित आहे का आम्हाला कि हे पण नाही माहित
पण हेच स्व:ताला महाराष्ट्रीयन बोलणारे ह्यांना इतीहास माहितच नाही
आजवर केलेली चूक सुधरवण्याचा प्रयत्न करा जगा समोर खरा संभाजी कसा होता सांगा
पराक्रम धाडस धैर्य शौर्य सांगा नक्कीच तुमच्या मनातील गैर समाज दूर होतील

माझा शंभूराजा वाघाचा छावा होता शेर होता शंभू राजा शिवाजी राजांचा मातीसाठी अमर झालेला छत्रपती होता
**********शंभू तुझ्या रक्ताने पावन झाली या महाराष्ट्राची माती तूच आहेस माती साठी अमर झालेला छत्रपती*******
होय या महाराष्ट्र साठी महाराष्ट्राच्या माती साठी ह्या सह्याद्री साठी अमर झाला शंभू राजा
अरे माहित नसेल तर विचारा
ह्या सह्याद्रीला
माहित नसेल तर विचारा वादळांना
माहित नसेल तर विचारा पाना फुलांना
तुम्हाला माहित नसेल तर
ते ही सांगतील कि कसा होता शंभू राजा कसा होता वाघाचा छावा कसा होता हजारोंशी एकटा झुंजनारा शंभू राजा .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
अजयसिंह घाटगे .
२६.०८.२०१४
९७६२८७९८८९

तुझ्या नाजूक हातावरील मेहंदी


तुझ्या नाजूक हातावरील
मेहंदी पाहिली कि वाटते
आपले स्वप्न पूर्ण झाले
पण तीच मेहंदी माझ्या
हातावर पाहिली कि
वाटते आज हि ते स्वप्न स्वप्नच
राहिले .

अजय घाटगे

जय शिवराय


जय शिवराय

इतीहास वाचताना
इतिहासाची पाने चाळताना
वाटत
आज हि शिव-शंभू
इथे आहेत
गडकोट जेव्हा सर
करतो
तेव्हा जी शिव गर्जना
निघते
त्या गर्जनेत हि
छत्रपती शिवराय अजून
जिवंत आहेत
आज हि मना मनात
छत्रपतींचे विचार जागृत आहेत
पाहता सह्याद्रीकडे
वाटते आज हि या सह्याद्री च्या
कुशीत बागडतोय शिवरायांचा छावा
सांगतो आज हि त्यांचा पराक्रम
ह्या सह्यारीचा वारा

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
जय सह्याद्री

लेखक
अजयसिंह घाटगे

नजरेला नजर मिळवली नाही कुणी

नजरेला नजर मिळवली नाही
कुणी
अरे मिळवतील तरी कसे
वाघ होता माझा राजा
अफुजुल्याला फाडणारा
शेर होता जिजाऊचा छावा
दिस रात एक केली स्वराज्य साठी
महाराष्ट्राला सुवर्ण किरणे दाखवली
ती याच वाघाने
मर्द शोभला मराठ्याच्या
साऱ्या जगाला हेवा आहे
असा होता छावा जिजाऊचा ..

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
अजयसिंह घाटगे

कधी हि पहा असाच दिसेन मी

कधी हि पहा असाच दिसेन मी
कधी हि पहा असाच दिसेन मी
कधी हि पहा असाच वागेन मी
कधी हि पहा असाच राहीन मी
मनात तुमच्या मैत्रीची आठवण
साठउन ठेवीन
विस्वास फक्त ठेवा
तुमच्या मैत्री साठी माझ्या
हृधयाच दार सतत
उघडे ठेवीन मी .

अजयसिंह घाटगे

स्वराज्यातील गवताच्या काडीचा हि मान राखणारे महान राजे तुम्ही

स्वराज्यातील गवताच्या काडीचा हि
मान राखणारे महान राजे तुम्ही
मर्द मराठ्यांचा अभिमान
तुम्ही
जिजाऊचे पुत्र अख्या महाराष्ट्राचे वाली तुम्ही
स्वराज्यासाठी लढलेले महान योद्ध तुम्ही
महाराष्ट्रास सुवर्ण किरणे दाखवणारे
स्वराज्याचे शिल्पकार तुम्ही ..

जय शिवराय
जय जिजाऊ
जय शंभूराजे

अजयसिंह

मराठा


मराठा

इतिहाच्या मुळा पर्यंत गेले कि नक्कीच सुवर्ण अक्षरात लिहावा असा इतिहास मराठ्यांनी घडवला असेच दिसेल
शिव छत्रपतींच्या काळा पासून जर पाहायला गेले तर मराठे फक्त मरना साठीच जन्म घेतात हे त्या इतिहासा मध्ये ही दिसते आणि हो माती साठी मरणारे मरणारे मराठेच होते शेकडो मावळे जेव्हा हजारोंशी लढायचे तेव्हा ते हजार हि त्यांना कमीच असायचे .. शिकवण आणि धाडस या जोरावर कधी एकाचा शंभर व्हायचा हे कळायचे देखील नाही .. ही शिकवण होती शिवरायांची ...आणि शिवरायांना ही माहित होत माझा एक मावळा म्हणजे शंभरांना भारी आहे ..या सह्याद्रीच्या कुशीत जो वाढतो तो वाघाशी टक्कर घेऊ शकतो हे त्या वेळी सांगितले होते, ह्या महाराष्ट्राचे पाणी आणि सह्याद्रीचा वारा जो पितो तो कुठे ही असो वाघा सारखाच असतो,,

घ्यावा इतिहास मनो मनी
करावे शिव कार्य
पहावा पराक्रम
करावा पराक्रम
वीर मराठे तुम्ही
स्वराज्या साठी
लढणाऱ्या मारणाऱ्या
मराठ्यांच्या
औलादी तुम्ही
शिकवा इतिहास
सांगा इतीहास
मना मनात रुजवावा
इतिहास
गर्वाने छाती
ठोकून सांगा
मर्द मराठ्यांच्या
राजाचा
आणि मावळ्यांचा
इतिहास .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा

लेखक
अजयसिंह घाटगे
२८.०८.२०१४


इतिहाच्या मुळा पर्यंत गेले कि नक्कीच सुवर्ण अक्षरात लिहावा असा इतिहास मराठ्यांनी घडवला असेच दिसेल
शिव छत्रपतींच्या काळा पासून जर पाहायला गेले तर मराठे फक्त मरना साठीच जन्म घेतात हे त्या इतिहासा मध्ये ही दिसते आणि हो माती साठी मरणारे मरणारे मराठेच होते शेकडो मावळे जेव्हा हजारोंशी लढायचे तेव्हा ते हजार हि त्यांना कमीच असायचे .. शिकवण आणि धाडस या जोरावर कधी एकाचा शंभर व्हायचा हे कळायचे देखील नाही .. ही शिकवण होती शिवरायांची ...आणि शिवरायांना ही माहित होत माझा एक मावळा म्हणजे शंभरांना भारी आहे ..या सह्याद्रीच्या कुशीत जो वाढतो तो वाघाशी टक्कर घेऊ शकतो हे त्या वेळी सांगितले होते, ह्या महाराष्ट्राचे पाणी आणि सह्याद्रीचा वारा जो पितो तो कुठे ही असो वाघा सारखाच असतो,,

घ्यावा इतिहास मनो मनी
करावे शिव कार्य
पहावा पराक्रम
करावा पराक्रम
वीर मराठे तुम्ही
स्वराज्या साठी
लढणाऱ्या मारणाऱ्या
मराठ्यांच्या
औलादी तुम्ही
शिकवा इतिहास
सांगा इतीहास
मना मनात रुजवावा
इतिहास
गर्वाने छाती
ठोकून सांगा
मर्द मराठ्यांच्या
राजाचा
आणि मावळ्यांचा
इतिहास .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा

लेखक
अजयसिंह घाटगे
२८.०८.२०१४

तुझी अदा आहे जरा निराळी


तुझी अदा आहे जरा निराळी
मनात प्रेम आणि
ओठावर अलगत हसू घेऊन
येणारी

तुझी आहे अदा जरा निराळी
दिसताच मनाला भावणारी

तुझी अदा आहे जरा निराळी
ओठावर हसू आणि
डोळ्यातून प्रेम दाखवणारी

तुझी अदा आहे निराळी
प्रेम असून हि कधी
न सांगणारी
मनात काय आहे हे
नजरेतून सांगणारी

तुझी अदाच आहे जरा निराळी
ब बोलता
हसण्यातून
प्रेमाचा वर्षाव करणारी ...

अजयसिंह घाटगे

__//\\__ जगाला आहे हेवा तुझा देवा

__//\\__

जगाला आहे हेवा
तुझा देवा
तुझी भक्ती हेच
आमचे कर्म देवा
तुझ्याच इतिहासाची
पाने चाळतो आम्ही
तुलाच आदर्श मानतो
आम्ही देवा
खूप उपकार तुझे
आहेत महाराष्ट्रा वरी
तुझा पराक्रमाचे गुन गान
गाईल प्रत्येक मावळा
मरणाच्या ही दारी

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे .

लेखक
अजयसिंह घाटगे सरकार
०१.०९.२०१४

माझे वाखाय्न विषय :-आम्हाला अजून शीव-शंभू माहित नाहीत.........

माझे वाखाय्न

विषय :-आम्हाला अजून शीव-शंभू माहित नाहीत.........

आज काल ज्या मुलाला विचारावे तो हेच सांगतो मला .. आमदार खासदार शिक्षक इंजिनिअर व्हायचं आहे पण त्यातील एक हि मुलगा असा नाही म्हणत कि मला राजा व्हायचं आहे मला छत्रपती व्हायचं आहे मला शिवरायांच्या विचारांचा मावळा व्हायचं आहे मला हत्तीला मारणारा येसाजी व्हायचं आहे मला कोंढाणा घेतलेला तानाजी व्हायचं आहे मला एकट्याने खिंड लढवलेला बाजी व्हायचे याच कारण आम्ही आमच्या मुलांना कधी शीव-शंभू शिकवलेच नाहीत आम्ही कधी त्यांना इतिहास सांगितलाच आम्ही त्यांना त्या कडे कधी घेऊन गेलोच नाही
याला आपण जबाबदार आहोत कालच माझ्या कपाळा वरील चंद्रकोर पाहून एक मुलगी मला म्हणाली कि शिवरायांचे वारे जास्तत आहे आज काल
पण त्या मुलीला इतिहास माहित नाही म्हणून जर ती बोलली असेल तर त्याला जबाबदार तिचे आई वडील असतील आहेत असणार कारण अजून हि त्या मुलीला शीव-शंभू माहित नाहीत अजून हि त्या मुलीला इतिहास माहित नाही कारण तिच्या पालकांनी तिला कधी सांगितलेच नाही शीव-शंभू कधी संगीतालाच नाही इतिहास
ज्यांच्या रक्तातून हे स्वराज्य निर्माण झाले ते मावळे अजून सांगितलेच नाहीत
सांगितलं तरी कसे ... कारण त्यांना आज सर्व ऐशो आरामात मिळत आहे ना सुखा सुखी जीवन जगत आहेत ना ते .. पण दुर्दव या महाराष्ट्राचे कि ज्या कुशीत शीव-शंभू वाढले शिवरायांच्या मुळे हा महाराष्ट्र घडला शंभू राजांच्या बलिदानातून ह्या महाराष्ट्राची माती पावन झाली हे अजून देखील माहित नाही ...... या पेक्षा मोठे दुर्दव काय असणार ... माझा एक प्रश्न त्या पालकांना जांच्या मुलांना इतिहास माहित नाही जिजाऊ शीव-शंभू माहित नाहीत .. त्यांनी आज वर केले काय जर तुम्हाला माहित नसेल तर माहित करून घ्यायला हवा होता इतिहास तुम्ही शिरायांच्या स्वराज्यात राहता घ्यायला हवा होता तुम्ही जिजाऊमाते चा आदर्श शिकवायला हवे होते शिव-शंभूराय पण तुम्ही त्यांना शाळा कॉलेज शिकूउन जर तीर मारला असेल असे वाटत असेल तर तुमचा भ्रम आहे तो .. कारण हे स्वराज्य हा महाराष्ट्र जिजाऊ मातेच्या च्या शिकवणीतून शिवरायांच्या पराक्रमातून शंभू राजेंच्या बलीदांतून घडला आहे म्हणून तुम्ही मी हे गाव हे शहर हे राष्ट्र आहे
आणि जर तुम्ही तुमच्या मुलांना जिजाऊ ,शिव-शंभू इतिहास शिकवला नसेल तर तुमचे शिक्षण आणि जीवन वर्थ आहे कारण तुमच्यातील जिजाऊ तुम्ही नाही बनू शकला तुमच्यातील शिव-शंभू तुम्ही नाही घडउ शकला
तुमच्यातील आदर्श माता-पिता तुम्ही बनू नाही शकला
जो पर्यंत या महाराष्ट्रातील प्रत्येक मुलांना जिजाऊ शीव-शंभू समजत नाहीत तो पर्यंत तुम्ही तुमच्या मुला कडून कसलीच अपेक्षा करू नाही शकत हि वास्तवता आहे
लिहतात हे गाडी वर राजे छत्रपती काढतात फोटो गाडीवर शीव-शभूंचे पण त्यांना विचार कोठे माहित आहेत शीव-शभूंचे कधी सांगितलेच नाहीत ते विचार आपला मुलगा मुलगी काय करते कोणते शिक्षण घेते हे माहित आहे आपल्याला पण तो इतिहास माहित नाही ज्या साठी असंख्य मावळ्यांनी रक्ताचे पाठ वाहिले आहेत ते मावळे हि माहित नाही काय कामाचे आयुष
जीवन जगताना असे जगावे कि त्या जगण्याला हि अर्थ असावा नाही तर आला गेला गंगेला मिळाला हे असतेच असते
इतिहाच्या मुळा पर्यंत जाने हे आपले कामच नाही तर कर्तव्य आहे
आणि ते तुम्ही आम्ही प्रत्येकाच्या मना मनात रुजवले पाहिजेत मी एकटा नाही रूजउ शकत ते तुम्ही हि रुजवले पाहिजेत तेव्हाच तुम्हाला आम्हाला एक आदर्श पालक म्हणून घेत येईल.....
जाता जाता येव्डेच सांगेन कि
शिकावे शिव-शंभू
शिकवावे शिव-शंभू
सांगावे शिव-शंभू
मना मनात रुजवावे शिव-शंभू

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र .

लेखक
अजयसिंह घाटगे सरकार

नाही माघार घेतली कधी


नाही माघार घेतली कधी
नाही अन्याय केला कधी
मुजरा अश्या महान
छत्रपतीस ज्याचे
नाव घेता ही
वादळ निर्माण होती ..

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
अजयसिंह घाटगे

मी फक्त शिवरायांचे गुण गातो

मी फक्त शिवरायांचे गुण गातो आणि शिवरायांचे गानार कारण या स्वराज्यात फक्त शिवरायांचाच मावळा छाती ठोक पने बोलतो ..

जय शिवराय
जय महाराष्ट्र

अजयसिंह घाटगे

शिव सकाळ


शिव सकाळ

दाही दिशा जय घोष तुमच्या
नामाचा
नभात हि आवाज घुमतो तुमच्या
शिव गर्जनेचा ..

जय जिजाऊ
जय शिवराय

अजयसिंह

या भगव्या साठी जगतो आम्ही


या भगव्या साठी
जगतो आम्ही
कुण्या ऐर्या गैर्याच्या
इश्याऱ्यावर नाही चालत
शिवरायांच्याच
भगव्याचा प्रचार करतो आम्ही
कुण्या पक्षाचा
प्रचार करत नाही आम्ही
पराक्रमाने आणि धाडसाने
फडकला आहे हा भगवा
इतिहास याचा छाती ठोक
पने सांगतो आम्ही .

जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र .

लेखक -कवी
अजयसिंह घाटगे सरकार

प्रथम तुला वंदितो शिवराया


प्रथम तुला वंदितो
शिवराया
तुझाच इतिहास सांगतो
तुझ्या प्रक्रमाचेच
धडे घेतो
तुझ्याच पराक्रमाचे
धडे शिकवतो
घेतलास जन्म जिजाऊ पोटी
स्वराज्याचा झालास वाली
तुझ्याच पराक्रमाने भगवा फडकतो
तुझ्याच इतिहासाची गाथा सागंतो
प्रथम तुला वंदितो .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
अजयसिंह घाटगे घाटगे सरकार

धाडस फक्त शंभूराजाच

धाडस फक्त शंभूराजाच
त्या धडसा पुढे लाखो ही
माघार घ्यायचं
असले हजार तरी
एका पायावर मातीती
गाढायचं हे धाडस होत
शंभू राजाच .

जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
अजयसिंह घाटगे

जय शंभूराजे


जय शिवराय
जय शंभूराजे

ज्याच्या पराक्रमाची महतीसांगता
अंगात रक्ताची लाट उसळे
तोच शंभू छत्रपती

ज्याच्या धाडसा पुढे सर्वांची
गती थांबली
तोच शंभू छत्रपती

ज्याच्या आवाजा पुढे
लाख मोघल हि घ्यायचे
नमती
तोच शंभू छत्रपती

ज्याच्या एका इशाऱ्यावर
शेकडोंची सेना हजारोंना
भारी पडायची
तोच शंभू छत्रपती

ज्याच्या मुखातून
वाघाची डरकाळी निघायची
तोच शंभू छत्रपती

ज्याच्या रक्ताने पावण झाली
या महाराष्ट्राची माती
तोच होता शंभू छत्रपती .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे.

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार
१०.०९.२०१४
वेळ ९.०७ सकाळ

आई थोर तुझे उपकार तुझ्याच पुत्राने निर्माण केले स्वराज्य


आई थोर तुझे उपकार

तुझ्याच पुत्राने निर्माण
केले स्वराज्य
तुझ्या कुशीत वाढले
शिव छत्रपती
आई थोर तुझे उपकार

तू संस्काराची खान
आई तूच आहेस महान
आई थोर तुझे उपकार

तूच शिकवले
झुंझायला
रणी वादळे निर्माण
करायला
आई थोर तुझे उपकार

शिकवण तुझी
होती महान
त्या शिकवणीने
घडले महाराष्ट्र
आई थोर तुझे उपकार

आई थोर तुझे उपकार
तुझाच पुत्र महाराष्ट्राची
शान .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
अजयसिंह घाटगे सरकार

स्वराज्य स्थापनेची शपत घेउनी

स्वराज्य स्थापनेची
शपत घेउनी
केले स्वराज्य स्थापन
तुम्ही
गाढले मातीती सैतान
रोवली भगव्याची मेख .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक_कवी
अजयसिंह घाटगे

या जगात छत्रपतींच्या पेक्षा कोणी महान नाही

या जगात छत्रपतींच्या पेक्षा कोणी महान नाही
या जगात कोणी त्यांच्या सारखा पराक्रम केला नाही
या जगात कोणी त्याच्या सारखा वीर नाही
या जगात ज्यांची कीर्ती आहे महान
तेच छत्रपती
या जगात पुन्हा होणार नाहीत
एकच आवाज एकच पर्याय
जय जिजाऊ जय शिवराय

अजयसिंह

देखा तुझे तो


देखा तुझे तो
दिल मेरा बोला
छोड दे उसे
तुझे शेरनी कि
तलाश है
वो है बर्फ का
गोला.

अजयसिंह घाटगे

ये सिर्फ गुलाब नही


ये सिर्फ गुलाब नही
ना इसे फुल समज
ये दील है मेरा
तू सिर्फ इसे
संभाल कर रखं.

अजयसिंह घाटगे

हमे तो सिर्फ


हमे तो सिर्फ
प्यार करना आता
है
नफरत तो मजाक मै
हमारे दोस्त
भी हमसे करते है .

अजयसिंह

झुरते तुझ्या साठी


झुरते तुझ्या साठी
एकांत पत्करते तुझ्या
तुझ्या साठी
कधी तरी आठवण
येते काय रे
माझी तुला तुझ्या
मनाला आधार देण्या साठी .

अजयसिंह ........!

कधी येतोस परतुनी

कधी येतोस
परतुनी
आज तुझीच आस आहे
तुझ्या येण्या कडे माझे
डोळे लागले आहेत ....!

अजयसिंह...... !!!!!!!!!

तुझ्या येण्याची चाहूल

तुझ्या येण्याची चाहूल
लागली
मी तुझीच वाट पाहते
दुरावा आता सहन
होत नाही प्रियतमा
तुझ्याच साठी जगते .

अजयसिंह.......!!!!!!!

नजर

नजर तुझ्या
येण्या कडे
लागली आहे
तुझ्या येण्याची
वाट ह्र्धय हि
पाहू लागल आहे ........!!!

अजयसिंह........!

दिवस तुझ्या आभासात निघून


दिवस तुझ्या
आभासात निघून
जातात
रात्र तुझ्या स्वप्नाची
वाट पाहते
तुझ्या येण्या कडे
डोळे लागतात
तू आला नाहीस कि
डोयात अश्रुची वादळे दाटतात ..

अजयसिंह .......!!!!!

जिजाऊ मातेचा वाघ


हजारो संकट आली
तरी मागे नाही
हटला
जिजाऊ मातेचा
वाघ फक्त स्वराज्या साठी
लढला
आले किती गेले किती
हिशेब नाही ठेवला
शिवबाचा छावा
माती साठी अमर झाला.

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे .

लेखक
अजयसिंह राजेघाटगे सरकार .

LOVE You

तुझ्या त्या LOVE You बोलण्यान
आज आपल्यात एक नात निर्माण
झालं
तुझ्या शब्दांत एक निस्वार्थी प्रेम जाणवल .

लेखक
अजयसिंह घाटगे....!!!

ये प्यार महोबत का

ये प्यार महोबत का
शौख हम नही रखते
नही तो हमारे दिवाने
आपसे भी खूब सुरत है ......

अजयसिंह....!

कधी हरवलो कधी विसरलो

कधी हरवलो
कधी विसरलो
कधी सावरलो
कधी दुखावलो
कधी हसलो
कधी हसवलो
जीवन यात्रेच्या
संघर्षात
नव्याने झेप घेण्या
साठी सज्ज झालो .

अजयसिंह घाटगे सरकार .....!!!!!!!!

विसरू शकत नाही


विसरू शकत नाही
तुझ्या प्रेमाला
विसरू शकत नाही
तुझ्या आठवणीला
विसरू शकत नाही
तू दिलेल्या वेदनांना
विसरू शकत नाही
तू सोडून गेलेल्या
त्या डोळ्याने
पाहिलेल्या दिवसाला .

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे...!

आठवण तुझी .


आठवण तुझी .

आठवण तुझी
सतत सोबत असते
आठवण तुझी
मानत एक आशा
निर्माण करते
आठवण तुझी
मनाला आधार देते
आठवण तुझी
मनातील भाव
जाणून घेते
आठवण तुझी
माझ्या मनावर राज
करते .....!

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे......!

शेर का जिगर रखता हु ...


मत देख पगले
मराठे कि औलाद हु
आंख मै आग
और
शेर का जिगर रखता हु ...

जय शिवराय
जय महाराष्ट्र
जय मराठा

लेखक-कवी
अजयसिंह....!

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराय


शिव सकाळ
इतिसाच्या पाना कडेच
नाही तर
या स्वराज्यातील
गड कोटा कडे जरी पाहिले
तरी तुम्हीच दिसता
राजे
दिसतो तो तुमचा
पराक्रम
तुमचे धाडस
तुमचे शौर्य
आठवतो तो
तुमचा गनिमी कावा .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराय

लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार
१८.०९ .२०१४
९७६२८७९८८९

भगव्या साठीच झगडायचे

मनात एकच इच्छा
आहे
भगव्या साठीच
लढायचे
भगव्या साठीच
झगडायचे
महाराष्ट्रा साठी
झुंजायचे
शिवरायांच्या
भगव्या साठी
मराय लागले तरी
मरायचे .....!

जय शिवराय
जय शंभूराय
जय महाराष्ट्रा .

लेखक
अजयसिंह घाटगे .

कृपया कोणी ही कॉपी करू नका ......

सह्याद्रीचे वाघ


सह्याद्रीचे वाघ
ज्यांच्या शब्दावर
होत होते शेकडोंचे
हजार
होते हाती भगवे निशाण
हेच दोन शेर
महाराष्ट्राची शान.......!!!!!!

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराय.

अजयसिंह घाटगे ......!