Tuesday, 29 April 2014

आई साठी काय लिहू


आई साठी काय लिहू    
आई साठी कसे लिहू   



आई पेक्षा मोठे शब्द नाहीत  
माझे  

आई साठी लिहिण्या इतके हि 
 छान नाहीत ते शब्द   



आई राबते दिस राती   
लेकराच्या आपल्या पोटा 
साठी 




गगनात उडत पाखरू    
जीवात जीव नसतो आईच्या 
पाखरा साठी जीव तळमळ तो   
सतत त्या माई चा  



झुरत असतो जीव बाहेर असता  
लेकरू  

डोळे शोधत असतात तिचे  
कुठे आहे माझ वासरू 



वासरा साठी साठी जशी 
गाय तळमळ ते 
तशीच लेकरा साठी 
ती आईच तळमळते     



सांगतो मी आज तुम्हाला 
हात जोडून __//\\__ 
नका ठेऊ आई बाबांना  
अनाथ अश्रमात  
आई बाबांची सेवा  
या पेक्षा कार्य चांगले दुसरे 
नाही या जगात  . 



लेखक_कवी 
अजय घाटगे 
२६.०१.२०१४ 









आई तुझे कडे येणार आहे ग मी आई 
तुझ्या आठवणीत माझा जीव कासावीस 
होतो आई .....................



कशी गाऊ महिमा तुझी 
मला कळत नाही 
तुझ्या सारखे दैवत साऱ्या 
जगा मध्ये नाही ................



उपकार तुझे किती हि केले 
तरी नाही फिटणार आई 
आई तुझ्या सोबती मला 
राहू दे ग आई ................



तुझा मुलगा मोठा झाला 
तरी तुझ्या पेक्षा लहान आहे 
आई 

तुझ्या सोबत राहू दे ग 
त्याला माझी आई ..............



खूप आठवण येत आहे मला 
तुझी आई 

लिहताना हि डोळ्यातून माझ्या 
अश्रू थाबत नाही ..............



जरी असलो कवी मी तरी 
तुझ्या पुढे नाही
तुझ्या पुढे शब्द माझे शून्य  
आहेत ग आई .......






लेखक_कवी .
अजय घाटगे 

No comments:

Post a Comment